लेखक : प्रा शरद मनसुख " उच्चविद्याविभूषीत ॲड काळे साहेब आहेत केंब्रीज रिटर्न , सहकारमहर्षी दादासाहेबांच्या कार्याचा त्यांनी क...
लेखक : प्रा शरद मनसुख
"
उच्चविद्याविभूषीत ॲड काळे साहेब आहेत केंब्रीज रिटर्न ,
सहकारमहर्षी दादासाहेबांच्या कार्याचा त्यांनी केला
कायम वसा व वारसा जतन ,
महाराष्ट्रात गाजतोय त्यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर
बाजार समितीच्या प्रगतीचा दमदार पॅटर्न" .
अखंड
हिंदुस्तानचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने व क्रांतीसुर्य
महात्मा फुले व भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जुन्नर
तालुका .आणि या जुन्नर शहराच्या जवळ असणाऱ्या एका छोट्याशा अमरापुर या गावी सहकार महर्षी
शिवाजीराव काळे व पार्वताबाई काळे यांच्या पोटी संजय काळे यांचा जन्म झाला .बालपणापासून
शिक्षणाची आस असणारे व कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले ॲड.संजय शिवाजीराव काळे यांचे उच्चशिक्षण
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे झाले . त्यानंतर एम ए पुणे विद्यापीठात करून
ते गोल्ड मेडॅलिस्टचे मानकरी ठरले . व स्वतः च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर पुणे विद्यापीठाची
शिष्यवृत्ती घेऊन नंतर एल एल . एम केंब्रिज विद्यापीठ ,इंग्लंड येथे पूर्ण केले . कायदयाचे
शिक्षण घेतल्यानंतर काही वर्ष पुणे जिल्हा न्यायालय व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये
वकिली व्यवसाय सुरू केला . मात्र तेथे त्यांचे मन काही रमेना म्हणून समाजकारण व सहकार
आणि शिक्षण क्षेत्रात मनापासून काम करण्याची आवड असल्यामुळे व सहकार महर्षी शिवाजीराव
काळे यांच्या कार्य कर्तृत्वाचा वसा व वारसा पुढे समर्थपणे चालविण्यासाठी साहजिकच त्यांचा
ओढा व आवड या सर्व क्षेत्राकडे वळला .
खऱ्या
अर्थाने स्वातंत्र्योत्तर कालखंडात महाराष्ट्र राज्याची जी सर्वांगीण प्रगती झाली,
ती मुख्यता औद्योगिक व कृषी ,सहकार या क्षेत्रात झालेली दिसून येते .सहकारामध्ये फायदा
किंवा नफा महत्त्वाचा नसतो तर मागास व दुर्बल घटकांचे हित व कल्याण साधणे हे महत्त्वाचे
असते . "विना सहकार ,नाही उद्धार "हे सहकाराचे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात सत्यात
उतरवणारे सहकार महर्षी शिवाजीराव तथा दादासाहेब काळे यांनी जुन्नर तालुक्यात सहकाराचे
रोपटे लावले आणि त्या लहानशा रोपट्याचे महाकाय वटवृक्षात रूपांतर करण्याचे महत्त्वाचे
कार्य ॲड.संजय शिवाजीराव काळे यांनी केले .बँक , सहकार व शिक्षण व सामाजिक क्षेत्रात
आपल्या कार्य , स्वकर्तृत्वाने अल्पावधीत वेगळा ठसा उमटविलेला आहे .
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल 45 कोटीची भांडवली गुंतवणूक ते आता 1200 कोटीची वार्षिक उलाढाल असलेली राज्यातील अग्रेसर बाजार समिती म्हणून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती आज ओळखली जाते .विशेषतः कांदा - बटाटा मार्केट ,डाळिंब मार्केट , तसेच संपूर्ण भारतात सुप्रसिद्ध असलेली टोमॅटो मार्केट व तरकारी ,भाजीपाला मार्केट , गुरांचा बाजार , शेतकरी निवास, शॉपिंग सेंटर व अनेक सुख सुविधायुक्त तसेच बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास अल्प दरात बाजार समितीच्या आवारात भोजन मिळावे ही संकल्पना सभापती ॲॅड . काळे साहेबांनी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नारायणगाव टोमॅटो मार्केट मध्ये ' लोकनेते शरदचंद्रजी पवार भोजन थाळी ' सुरू केली आहे .अशा जुन्नर मुख्य बाजार तसेच नारायणगाव ,ओतूर , बेल्हे,आळेफाटा या उपबाजाराच्या माध्यमातून ही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून नव्याने ओळखू लागली आहे .याचे महत्त्वाचे मुख्य कारण म्हणजे बाजार समितीचे नेतृत्व करणारे कार्यक्षम सभापती ॲड.संजय शिवाजीराव काळे यांची दूरदृष्टी व बळीराजा केंद्रस्थानी ठेवून नवनवीन नवनिर्मितीचा व प्रगतीचा ध्यास हा होय. सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरासाठी जुन्नर बाजार समितीच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, किराणा व कपडे देण्याचे महत्त्वाचे कार्य सभापती ॲड. संजयराव शिवाजीराव काळे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमपणे केले .तसेच कोरोना सारख्या जागतिक महामारीत भूमिहीन, दुर्बल घटक, होतकरू व गोरगरीब व असंख्य कुटुंबांना घरपोच किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून निराधारांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले .अनेक समाज उपयोगी उपक्रमातून व कार्यातून गोरगरिबांचा आशीर्वाद व दुआ निश्चितच साहेबांना मिळेल .
पी
डी सी सी बँकेचे उपाध्यक्ष व संचालक म्हणून कार्य करताना पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून
माझ्या बळीराजाला व गरजू,निराधार घटकांना बँकेच्या
माध्यमातून सर्वतोपरी आर्थिक सहाय्य देऊन न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले .बँकेच्या
सर्व जुन्या शाखा इमारतींना अत्याधुनिक असे कॉर्पोरेट रूप देऊन बँकेचे स्वरूप बदलण्याचे
व कायापालट करण्याचे उत्कृष्ट कार्य ॲड.काळे साहेबांनी केले .बँकेत आलेल्या प्रत्येक
व्यक्तीस समाधान देण्याचे व त्यांचे कार्य सहज व सुलभ रित्या होण्याकडे त्यांचे प्राधान्य
असते . शेवटी ग्राहकाचे हित व बळीराजाचे समाधान हे महत्त्वाचे मानून त्यांनी उत्कृष्ट
कार्य केले व सातत्याने आजही करत आहेत .
किल्ले शिवनेरीच्या पवित्र कुशीत जुन्नर तालुका शिवनेर
शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना संस्थेचे संस्थापक , अध्यक्ष सहकार महर्षी शिवाजीराव
तथा दादासाहेब काळे यांनी 1970 मध्ये केली . आणि श्री शिव छत्रपती महाविद्यालय सुरू
झाले .शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचली पाहिजे व सर्व तळागाळातील दुर्बल व आदिवासी,
ग्रामीण भागातून महाराष्ट्राचे व भारताचे उज्वल भविष्य घडवणाऱ्या चांगल्या पिढ्या तयार
झाल्या पाहिजे हा विचार समोर ठेऊन या संस्थेची धुरा सन 2007 पासून संस्थेचे विद्यमान
अध्यक्ष ॲॅड .संजय शिवाजीराव काळे यांच्याकडे आली .या महाविद्यालयात साधारणपणे दरवर्षी
साडेपाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात .यावर्षी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक
मंडळ या संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे व
सन्माननीय विश्वस्त मंडळाने संस्थेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील इयत्ता दहावीचे सर्व
गुणवंत विद्यार्थी, विशेषता प्रत्येक शाळेतील पहिले तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना
पेढे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शाळेमध्ये
किंवा घरी जाऊन सत्कार केला. तसेच त्यांना बहुमूल्य मार्गदर्शन करणारे शिक्षक व मुख्याध्यापकांचाही
सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला. शिवाय त्या गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात
मोफत प्रवेश दिला गेला .तसेच दरवर्षी असंख्य निराधार, होतकरू व गोरगरीब विद्यार्थ्यांना
संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करून आर्थिक सवलतही दिली
जाते . अनेक गरिबं व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये मोफत प्रवेश दिला
जातो .
अशाप्रकारे
बँक , सहकार , शिक्षण व समाजकारणात स्वकर्तुत्वाने व आपल्या दूरदृष्टीने नवनिर्मितीचा
ध्यास असणारे व स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे ॲड.संजयराव काळे हे महाराष्ट्राचे मा .
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी मानले जातात .
सहकार
रत्न ॲड.संजयराव शिवाजीराव काळे हे उच्चविद्याविभूषीत असून समाजकारणातील दूरदृष्टीचा
नेता , बँक व सहकार क्षेत्रावर मजबूत पकड असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व , दिलेला शब्द
प्रमाण म्हणून पाळणारे व स्पष्ट वक्ते, कार्यकुशल संघटक , उत्तम कार्य पद्धती , मुत्सद्दी
व निर्भय स्वभाव, धुरंदर राजकारणी अशी वेगळी ओळख असणाऱ्या आमच्या लाडक्या साहेबांना
अर्थात सहकार रत्न ॲॅड .संजयराव शिवाजीराव काळे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक
शुभेच्छा !
महाराष्ट्राच्या सहकार ,शिक्षण , सामाजिक व राजकीय
क्षितिजावर साहेब तुमचे नाव कायमच सूर्याप्रमाणे तेजस्वीपणे चमकत राहो हीच एक सदिच्छा
!
लेखक
: प्रा शरद मनसुख
श्री
शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर
COMMENTS