वर्धा: वडनेर पोलिसांनी नाकेबंदी दरम्यान एका आयशर टेम्पोची तपासणी केल्यावर एकूण 15 किलो 600 ग्राँम वजनाचा गांजा मिळून आला. पोलिसांनी टेम्पो...
वर्धा: वडनेर पोलिसांनी नाकेबंदी दरम्यान एका आयशर टेम्पोची तपासणी केल्यावर एकूण 15 किलो 600 ग्राँम वजनाचा गांजा मिळून आला. पोलिसांनी टेम्पोसह एकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
आषाढी एकादशी व
बकर ईद सणाचे निमित्त्याने कायदा व सुव्यवस्था कामी पोलिस स्टेशन वडनेर येथे दि. 09/07/2022 ते दि. 10/07/2022 रोजी चे रात्री
दरम्यान गस्त करीत असतांना खबरी मार्फत खात्रीशीर खबर मिळाली की राष्ट्रीय
महामार्ग क्रमांक 44 या मार्गे अंमली पदार्थ गांजाची वाहतूक होणार आहे. त्या अनुषंगाने मौजा
दारोडा टोल नाका येथे रोडवर पोलिस निरीक्षक कांचन पांडे पो.उप.नि. राजु सोनपितरे
यांच्यासह सहाय्यक फौजदार मारोती जांभळे,
नयाक पोलिस शिपाई प्रशांत मेश्राम,
राहुल कल्हाने, सचिन सुरकार, होमगार्ड सैनिक अमित सोनुले,
भुषण उगेमुगे हे नाकेबंदी करीत होते.
नाकेबंदी
दरम्यान आयशर ट्रक क्र. एम.एच. 40 ए. के. 6697 येताना दिसताच त्यास थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात एका काळ्या
बॅगमधे 15 किलो 600 ग्रॅम अंमली पदार्थ
गांजा आढळून आला. शिवाय, त्यामध्ये दोन जण बसलेले दिसले. एक जण अंधाराचा व शेतशिवाराचा फायदा घेत
पळून जाण्यास यशस्वी झाला.
मोक्क्यावर आयशर
ट्रक क्र.एम.एच. 40 ए.के. 6697 चा चालक अनिलकुमार श्रीजयकरण यादव (वय 21
वर्ष रा. गजरही उन्मुख पोस्ट कुबरी ता. सिंहावल जिल्हा सिधी स्टेट
मध्यप्रदेश) याच्या ताब्यातून एका काळ्या रंगाच्या एअर बँग मध्ये एकूण 15 किलो 600 ग्राँम वजनाचा गांजा
किंमत 1,50,000 रुपये आयसर क्र.
एम. एच. 40 ए. के. 6697 कि. 7,00,000 रु. एक
ॲन्ड्रॉईड मोबाईल किंमत 10,000 रुपये तसेच एक एअर बँग किंमत 1,000
रु. असा एकूण 8,61,000 रुपयांचा माल आरोपी कडून ताब्यात घेण्यात आला. तसेच पळुन गेलेल्या आरोपीचा
शोध सुरु आहे.
सदरची कार्यवाही
पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंखे,
उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट दिनेश कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस
निरीक्षक कांचन पांडे यांनी केली. कांचन पांडे पो. स्टे. वडनेर हे पुढील तपास करीत
आहेत.
COMMENTS