नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये एका चप्पल कंपनीच्या मॅनेजरने एका मुलीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे बलात्कारावेळी पत्नी समोर होती...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये एका चप्पल कंपनीच्या मॅनेजरने एका मुलीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे बलात्कारावेळी पत्नी समोर होती. तिनेही पतीला साथ दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
बलात्कार प्रकरणी सध्या मॅनेजरला अटक करण्यात आली असून त्याची पत्नी फरार आहे. बलात्कार करुन या मॅनेजरने नंतर मुलीला गुंगीचं विषारी औषध पाजले. त्यामुळे या मुलीची प्रकृती खालावली. अखेर तिला रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले होते. उपचारादरम्यान मुलीची प्रकृती सुधारली असून, पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर या धक्कादायक घटनेचा हळूहळू खुलासा झाला. या प्रकराने दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस कंट्रोल रुमला शुक्रवारी (ता. १५) एक फोन आला. या फोन कॉलवर एका व्यक्तीने माझ्या बहिणीवर बलात्कार झाला असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. एम्स रुग्णालयात पीडित मुलीवर उपचार सुरु होते. मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिला काहीच बोलता येत नव्हते. ती शुद्धीत आल्यानंतर पोलिसांनी 16 जुलैला या पीडितेचा जबाब नोंदवला आणि बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला. या पीडितेने दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
शुद्धीवर आल्यानंतर पीडित मुलीने सांगितले की, 'एका चप्पल बनवण्याच्या कारखान्यात काम करते. माझी बायको आजारी आहे, असे म्हणून कारखान्याच्या मॅनेजरने आपल्या घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर बायकोसमोर त्याने बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर जय प्रकाशने विषारी द्रव्य पाजले आणि घरी नेऊन सोडले. आपल्या घरात गेल्यानंतर बेशुद्ध पडले.'
दरम्यान, पोलिसांनी एनजीओसमोर या मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. या बलात्कार प्रकरणी आरोपी जय प्रकाश याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे.
COMMENTS