क्राईमनामा Live : हॉटेलच्या वेटरला जबरदस्तीने गाडीत टाकून घेऊन गेले पण पुढे... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : हॉटेलच्या वेटरला जबरदस्तीने गाडीत टाकून घेऊन गेले पण पुढे...

पुणेः   हॉटेलमध्ये आलेल्या गि-हाईकांना जेवणाचे बिलाची मागणी केल्यानंतर पाच जणांनी वेटरचे अपहरण केले होते. भारती विदयापीठ पोलिसांकडून अपहरण क...



पुणेः हॉटेलमध्ये आलेल्या गि-हाईकांना जेवणाचे बिलाची मागणी केल्यानंतर पाच जणांनी वेटरचे अपहरण केले होते. भारती विदयापीठ पोलिसांकडून अपहरण करणाऱया आरोपींना जेजुरी येथून जेरबंद केले असून, पुढील तपास करत आहेत.

सोमवारी (ता. ११) सायंकाळी आठच्या सुमारास हॉटेल रानमळा (नवीन कात्रज) येथे किशोर कोईराला याने बोगदयाजवळ, जांभुळवाडी कात्रज पुणे येथे वेटर म्हणून काम करणारा हॉटेलमध्ये आलेल्या गि-हाईकांना जेवणाचे बिलाची मागणी केली. याचा राग मनात धरुन त्यास पाच जणांनी मिळून जबरदस्तीने उचलून पांढ-या रंगाची ब्रेझा गाडी क्रमांक एम.एच.१६ बी.एच. ६४५६ या वाहनामध्ये जबरदस्तीने उचलून टाकले. जाताना म्हणाले की, उदया तुम्हाला याचे मरणाची बातमी येईल, असे म्हणून त्यास घेऊन गेल्याने हॉटेल मालकीन शारदा निलेश भिलारे (रा. भिलारेवाडी वाघजाई मंदीराशेजारी पुणे सातारा रोड) यांनी तक्रार दिल्याने भारती विदयापीठ पोलिस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. ४५६/२०२२ भादवि कलम ३६४,३२३,५०४,५०६,१४३,१४७ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी बाबत पोलिस कर्मचारी विक्रम सावंत व निलेश खैरमोडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे जेजुरी जवळ दोरगेवाडी (तालुका पुरंधर, जिल्हा पुणे) येथे डोंगरात लपून बसल्याचे समजले. सदरची बातमी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पोलिस उप निरीक्षक शिंदे त्यांचे स्टाफसह सदर ठिकाणी गेले तेथे जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिसांची मदत घेऊन मिळालेल्या बातमीचे ठिकाणी गेले असता सदरचे आरोपी हे ब्रेझा गाडी क्रमांक एम.एच.१६ बी/एच. ६४५६ चे बाजूला त्यांनी बसलेले दिसून आले. स्टाफच्या मदतीने त्यांना पकडून ताब्यात घेतले. १) नितीन अशोक वाडेकर (वय ३२ वर्षे, रा. शिर्डी लक्ष्मीनगर, तालुका रहाता, जिल्हा अहमदनगर), २) ओमकार जालिंदर बेंद्रे (वय २३ वर्षे, रा. राशीन, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर), ३) रुपेश अशोक वाडेकर (वय ३० वर्षे, रा. शिर्डी लक्ष्मी नगर, तालुका रहाता, जिल्हा अहमदनगर), ४) रविंद्र सकाहारी कानडे (वय ४१ वर्षे, रा. कोल्हार, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर), ५) योगेश सर्जेराव पारधे (वय २५ वर्षे, रा. कोल्हार, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केला असून, त्यांना स्टाफच्या मदतीने ब्रिझा गाडीसह भारती विदयापीठ पोलिस स्टेशन पुणे येथे आणले. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक कर्चे हे करत असल्याने सर्व आरोपीतांना पुढील तपासकामी त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी सागर पाटील, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ०२, पुणे शहर, सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त, जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संगिता यादव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), पोलिस निरीक्षक (गुन्हे), विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलिस उप निरीक्षक शिंदे, पोउपनिरी धिरज गुप्ता व तपास पथकांचे अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, मंगेश बोराडे, नरेंद्र महांगरे, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सांवत, निलेश खैरमोडे व तुळशीराम टेंभुर्णे यांनी केली आहे.

 

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : हॉटेलच्या वेटरला जबरदस्तीने गाडीत टाकून घेऊन गेले पण पुढे...
क्राईमनामा Live : हॉटेलच्या वेटरला जबरदस्तीने गाडीत टाकून घेऊन गेले पण पुढे...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgvrfn1TvqRULXiSqX3FgQ_dh3t3FfZimrCSJoPmVPkWo9b2ZpTQ3ogrwOEufy65WtAbhKSJt1WtL046oSW_Z0bLELPdupGZMPXFILTielXto9p5Ep3c6nkBQZ-OnH8naKwXfr5jiuH9gzl7KXhvNHxL7P1X-X9Kefzanp4Iyre2bqcGVmPRk_v0Hq5/s320/0e8721f668a5c20e3e5620073a427a76e7fc07b60adbe77130b1a0fc3d3db442.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgvrfn1TvqRULXiSqX3FgQ_dh3t3FfZimrCSJoPmVPkWo9b2ZpTQ3ogrwOEufy65WtAbhKSJt1WtL046oSW_Z0bLELPdupGZMPXFILTielXto9p5Ep3c6nkBQZ-OnH8naKwXfr5jiuH9gzl7KXhvNHxL7P1X-X9Kefzanp4Iyre2bqcGVmPRk_v0Hq5/s72-c/0e8721f668a5c20e3e5620073a427a76e7fc07b60adbe77130b1a0fc3d3db442.webp
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/07/live_72.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/07/live_72.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content