क्राईमनामा Live : ब्रेकींग न्यूज- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून “या” कारणामुळे केली हकालपट्टी... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : ब्रेकींग न्यूज- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून “या” कारणामुळे केली हकालपट्टी...

पुणे :   शिरूर लोकसभा मतदारसंघामधील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ए...



पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघामधील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटात सामील होत पक्षविरोधी काम केल्याचा ठेपका ठेवत आढळराव पाटील यांच्यावर ही कारवाई केली गेल्याचं सांगण्यात आलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

शिवसेनेत बंडखोरी सुरू झाल्यानंतर पक्षाच्या काही नेत्यांनी बंडखोर आमदारांना समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कारवाईचं सत्र सुरू असून अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ३९ आमदारांची मोट बांधली आणि बंडाचा झेंडा हाती घेतला. परिणामी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. या बंडखोर शिवसेना आमदारांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले जात आहे. तसंच सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आढळराव पाटील यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देताना लिहिलेला मजकूर त्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

काय होते आढळराव पाटील यांचे ट्विट?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं ट्वीट केलं आहे.

https://twitter.com/MPShivajirao

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : ब्रेकींग न्यूज- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून “या” कारणामुळे केली हकालपट्टी...
क्राईमनामा Live : ब्रेकींग न्यूज- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून “या” कारणामुळे केली हकालपट्टी...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOnML5j-KKTuG5nLwO1tL0xe357vikAfabltcPk5uVpH0FMFUuY2qIujD0645TO7y7pdhwU1zz7mKoqWRytVr7k4tapiaTou95II-WhxZklIQ22M8HC-G0firL0VP8at1Qzo8JnF8BTqTO2Ik3tXTChh6hAKmEqmtJEVA2b9rGrlubFAQPq_2tyjcQ/s1600/download.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOnML5j-KKTuG5nLwO1tL0xe357vikAfabltcPk5uVpH0FMFUuY2qIujD0645TO7y7pdhwU1zz7mKoqWRytVr7k4tapiaTou95II-WhxZklIQ22M8HC-G0firL0VP8at1Qzo8JnF8BTqTO2Ik3tXTChh6hAKmEqmtJEVA2b9rGrlubFAQPq_2tyjcQ/s72-c/download.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/07/live_58.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/07/live_58.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content