क्राईमनामा Live : पोलिसांनी लॉजवर बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला अन्... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : पोलिसांनी लॉजवर बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला अन्...

पुणेः   शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा ...



पुणेः शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दोघा युवतींसह लॉज चालकाला ताब्यात घेतले आहे.

तिघांवर गुन्हे दाखल करत दोघी युवतींची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे असलेल्या बालाजी लॉजवर बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार शंकर साळुंके, चंद्रकांत काळे, पोलिस नाईक अशोक केदार, अमोल दांडगे, महिला पोलिस नाईक ज्योती आहेरकर, उज्वला गायकवाड, पोलिस शिपाई किशोर शिवणकर यांनी सदर ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. सदर ठिकाणी लॉज चालकासह वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन युवती मिळून आल्या. पोलिसांनी सदर युवतींना ताब्यात घेत चौकशी केली असता लॉज चालक सुनील राठोड हा आम्हाला वेश्याव्यवसाय साठी ठेवत आम्हाला वेश्याव्यवसाय साठी प्रोत्साहित करत असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने दोन्ही युवतींसह लॉज चालकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र शिवाजी पानसरे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी लॉज चालक सुनील जयराम राठोड (वय २७ वर्षे रा. प्रथम सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. ब्राम्हणगाव ता. जिंतूर जि. परभणी) याच्या सह दोन युवतींवर गुन्हे दाखल करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनील राठोड याला पोलिस कोठडी सुनावत वेश्याव्यवसाय करणाऱ्या युवतींची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलिस शिपाई अतुल पखाले हे करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : पोलिसांनी लॉजवर बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला अन्...
क्राईमनामा Live : पोलिसांनी लॉजवर बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला अन्...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhD6CQ4Eusul2mtcYcGlP19NVbk0YM517piCW-YZmLrQGRrHJFmD5IpveOt0IjpbsvMp6-sFLu7MVI1sDLICWEXALRFAsfOvjjntrsU1T5rE7X5vrtUj8k5oicXHvG811R3gS-TyI4PWekHNrO7JigGkYvl9RR5fTR2MzvP7ClcShyb9hskdHYNWj5U/s320/a8f885c0e50bacc37d9cb06af78848ac480558b7c14f674642cf7f67c9796c8a.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhD6CQ4Eusul2mtcYcGlP19NVbk0YM517piCW-YZmLrQGRrHJFmD5IpveOt0IjpbsvMp6-sFLu7MVI1sDLICWEXALRFAsfOvjjntrsU1T5rE7X5vrtUj8k5oicXHvG811R3gS-TyI4PWekHNrO7JigGkYvl9RR5fTR2MzvP7ClcShyb9hskdHYNWj5U/s72-c/a8f885c0e50bacc37d9cb06af78848ac480558b7c14f674642cf7f67c9796c8a.webp
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/07/live_46.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/07/live_46.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content