अहमदनगर: दिराने केलेल्या मस्करीमध्ये वहिनीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना पोहेगाव (ता. कोपरगाव) येथे घडली आहे. दिराकडून लागलेल्या गोळ...
अहमदनगर: दिराने केलेल्या मस्करीमध्ये वहिनीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना पोहेगाव (ता. कोपरगाव) येथे घडली आहे. दिराकडून लागलेल्या गोळीबारात सुनीता भालेराव या वहिणीचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
सुनिता भालेराव यांचा मुलगा कल्पेश भालेराव याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. घटनेनंतर आरोपी विशाल भालेराव घटनास्थळाहून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, 'सुनीता भालेराव या केसांना कोरपड लावत असताना दीर आणि त्याचे दोन मित्र घरात आले होते. वहिणी बघ मी बंदूक आणली. याच वेळी आरोपी सिद्धार्थ याला चुलता विशाल यांनी विचारले की बंदूक कशी चालते? सिद्धार्थने देखील बंदूक हातात घेत खटका मागे ओढून पुन्हा विशालच्या हतात दिली. यावेळी घरातील व्यक्तींनी विरोध केला. मात्र चुलते विशाल यांनी फक्त वहीनीला दाखवण्यास आणल्याचे सांगातले", अशी माहिती कल्पेशने पोलिसांना दिली.
'थट्टा-मस्करीत बंदूक हाताळाणे सुरु होते. याच दरम्यान चुलते विशाल यांच्याकडून ट्रिगर दाबला गेल्या आणि आईच्या डोक्यात गोळी लागली. यावेळी आई सुनीता भालेराव रक्ताच्या थोराळ्यात पडल्या. तर आरोपी विशाल भालेराव, सिद्धार्थ कदम आणि अमोल भालेराव हे तिघे ही बंदूक आणि गोळ्या घेवून फरार झाले", असे कल्पेश भालेरावने पोलिसांना सांगितले. सुनीता भालेराव यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फरार आरोपी विशाल भालेराव याला पोलिसांनी अटक केली आहे.
गमंती गंमतीत पिस्टल दाखवत असताना गोळी झाडली गेल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी विना परवाना शस्त्र वापरणे, त्याचबरोबर इतर कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भादवि 304 , 201 34, 3, 27 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS