क्राईमनामा Live : कोपरखैरणे पोलिसांनी तीन पिस्तुलासह केली एकास अटक... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : कोपरखैरणे पोलिसांनी तीन पिस्तुलासह केली एकास अटक...

  नवी मुंबई: कोपरखैरणे पोलिसांनी तीन पिस्तुलासह एकास अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत केली असून, पु...

 


नवी मुंबई: कोपरखैरणे पोलिसांनी तीन पिस्तुलासह एकास अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत केली असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिस उप निरीक्षक सागर धुमाळ यांना ०८/०७/२०२२ रोजी त्यांच्या बातमीदाराने विश्वसनिय बातमी दिली की, एक जण तीन टाकी चौक, माथाडी हॉस्पीटल, कोपरखैरणे सेक्टर ६ नवी मुंबई येथे पिस्तुलासह येणार आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी लागलीच दोन वेगवेगळे पथके तयार करून त्याअनुषंगाने सापळा रचला. कोपरखैरणे एनएमटी बस डेपोच्या समोरील माथाडी हॉस्पीटलच्या बाजूस असलेल्या गल्लीतून येणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून डाव्या बाजुस कमरेजवळ खोवलेले एक रिव्हॉल्वर हस्तगत केले.

ऋषिकेश रणजित जायभाये उर्फ बाबु उर्फ बाब्या (वय २५ वर्षे, धंदा - बेकार, राहणार- गणेश मंदीर शेजारी कोपरखैरणे, नवी मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. त्याला विश्वासात घेवून अधिक कौशल्यपुर्ण तपास करून त्याचेकडून आणखी दोन पिस्तुल व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.

सदर आरोपीविरूध्द कोपरखैरणे पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्र. ३१६/२०२२ कलम ३, २५ शस्त्र अधिनियम १९५९, सह कलम ३७(१), १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरूध्द कोपरखैरणे पोलिस ठाणे येथे यापुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपीस १५/०७/२०२२ रोजी पर्यंत पोलिस कोठडी असून पुढील तपास चालू आहे.

सदर गुन्हयाचा तपास बिपीनकुमार सिंह, पोलिस आयुक्त, नवी मुंबई, जय जाधव, सह पोलिस आयुक्त, नवी मुंबई, विवेक पानसरे, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ १, वाशी, डी. डी.टेळे, सहा. पोलिस आयुक्त, वाशी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली प्रदीप तिदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे पोलिस ठाणे, गजानन कदम, पोलिस निरीक्षक, प्रशासन, व गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पोलिस उप निरीक्षक सागर धुमाळ, पोना/१८०२ राकेश पाटील, पोना/१७३७ योगेश डोंगरे, पोशि/१२१३४ गणेश गिते, पोशि/१२३४३ निलेश निकम, पोशि/१२३४२ अनिल बिहाडे, पोशि/ ३२३४ सचिन दळवी, पोशि/३७६० दोंदे, पोशि/२७३० हमरे यांनी अविरत मेहनत घेवुन आरोपीकडुन तीन पिस्तुल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : कोपरखैरणे पोलिसांनी तीन पिस्तुलासह केली एकास अटक...
क्राईमनामा Live : कोपरखैरणे पोलिसांनी तीन पिस्तुलासह केली एकास अटक...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQCwgCM_z2X-T9RljVWIIN-PrsU-4eiPNI0ujGeUMWX6sbVJoUSSnf3zn9GPQRcn93qe4rmuEkn7hMiy5rVAJFL7dTk5B56G7vnPgNm2WmCSnRArWClBzWzUhuWKe1xHWAfn7XhqnOBmI/s320/n4043940861e2592f6d3f0e2d8b1336de8b9ad4c6334f55d2a0c3019d04f3b47f6e5ff39d5.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQCwgCM_z2X-T9RljVWIIN-PrsU-4eiPNI0ujGeUMWX6sbVJoUSSnf3zn9GPQRcn93qe4rmuEkn7hMiy5rVAJFL7dTk5B56G7vnPgNm2WmCSnRArWClBzWzUhuWKe1xHWAfn7XhqnOBmI/s72-c/n4043940861e2592f6d3f0e2d8b1336de8b9ad4c6334f55d2a0c3019d04f3b47f6e5ff39d5.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/07/live_33.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/07/live_33.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content