प्रतिनिधी : प्रा.शरद मनसूख ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे शास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यां...
प्रतिनिधी : प्रा.शरद मनसूख ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे शास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. यु.बी. शेलार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार केला. या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. डॉ चासकर यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाला आणि प्र. प्राचार्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रलंबीत प्रश्न प्राधान्याने सोडवेल असे आश्वासन या प्रसंगी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. बाबासाहेब माने यांनी केले तर आभार प्रदर्शन स्टाफ अकॅडमी प्रमुख डॉ. एस.के. जोशी यांनी केले.
COMMENTS