सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : केंद्र सरकार पुरस्कृत 'स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय " या अभियानांतर्गत जिल्हास...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : केंद्र सरकार पुरस्कृत 'स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय " या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सदर स्पर्धेत शिवनेरी स्कूल खानापूर ता. जुन्नर या शाळेला जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती राजेद्र मुरादे यांनी दिली.
सदर पुरस्काराचे वितरण पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी संपन्न झाले. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्या शोभा खंदारे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रभाकर क्षीरसागर, प्रा. नामदेव शेंडकर आदी उपस्थित होते.
शिवनेरी स्कूल च्या वतीने अगोल थोरात संगणक विभागप्रमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सरस्वती कणसे व सचिव शुभंकर कणसे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
COMMENTS