पुणे : आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आळंद...
पुणे : आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आळंदी पोलिसांनी आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे, त्यांचे पती अशोक उमरगेकर आणि मुलगा अभिषेक विरुद्ध गुन्हे दाखल केला असून, ताब्यात घेतले आहे.
प्रियांका अभिषेक उमरगेकर (वय २२) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित सुनेचे नाव आहे. हुंड्यात ठरलेल्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रियांका या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या माजी नगर सेविका कमल घोलप यांची मुलगी आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका आणि अभिषेक यांचा ८ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आळंदीच्या भाजपच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर यांच्या घरातील हा विवाह असल्याने त्याला अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रियंका उमरगेकर यांनी मरकळ रोडवर असलेल्या राहत्या घरात रविवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी पोलिसांना कळविली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS