लखनौ (उत्तर प्रदेश): अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका नवऱयाने चक्क पत्नीचे नाकच कापल्याची धक्कादायक घटना बहराइच येथे घडली आहे. पत्नी गंभीर ज...
लखनौ (उत्तर प्रदेश): अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका नवऱयाने चक्क पत्नीचे नाकच कापल्याची धक्कादायक घटना बहराइच येथे घडली आहे. पत्नी गंभीर जखमी झाली असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
रजनी देवी (वय २६) नावाची महिला बेदनापूर येथील विद्युत विभागात कर्मचारी आहे. रजनी यांचे पती ज्ञानदत्त पाठक याच्याशी भांडण झाले होते. त्यानंतर ती रागावून माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर पतीने फोन करून तिची माफी मागितली आणि तिला घरी बोलावले. यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांसह तिकोरामोडजवळ दाताने कचाकच पत्नीचे नाक चावले. यानंतर गंभीर अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बोंडी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पती ज्ञानदत्तने शनिवारी पत्नीला घरी घेऊन परत जात होता. त्याचे साथीदार बिन्नू आणि एका अज्ञाताच्या मदतीने तिकोरामोड चौकीजवळ पत्नीला पकडले. यानंतर त्याने दाताने तिचे नाव चावले आणि बेदम मारहाणही केली. पीडितेची आई कुसुम तिवारी यांनी सांगितले की, आपल्या मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
COMMENTS