क्राईमनामा Live : बापरे! बेकायदेशीर सावकाराचा व्याजदर पाहा; घरात आढळले... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : बापरे! बेकायदेशीर सावकाराचा व्याजदर पाहा; घरात आढळले...

  पुणेः बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱयाला युनिट-१ गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. सतिश बन्सिलाल भाटी असे आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्या...

 


पुणेः बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱयाला युनिट-१ गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. सतिश बन्सिलाल भाटी असे आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून वेगवेगळया बँकेचे एकूण १६ पासबुकसह अन्य वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी यांचा भाऊ यास मे २०२० या महिन्यात अर्धांगवायुचा झटका आल्याने त्यास औषधोपचारासाठी पैशाची आवश्यकता होती. आरोपी सतिश बन्सिलाल भाटी याच्याकडे गेले होते त्यावेळी त्याने फिर्यादी यांना दरमहा दर शेकडा १५ टक्के व्याज दराने रक्कम रुपये ३०,०००/- व्याजाने दिले होते. त्यावेळी त्यांची अॅक्टिव्हा गाडी क्रमांक एमएच/१२/एसडब्ल्यु/७२२३ ही स्वतःकडे गहाण ठेवून घेतली व गाडीचे मुळ कागदपत्र व दोन कोरे चेक सिक्युरिटी म्हणून ठेवून घेतले होते. फिर्यादी यांनी १५ टक्के व्याजासह सर्व पैसे परत दिले होते त्यानंतर आरोपीने त्याचे साथीदारासह फिर्यादीचे घरात शिरुन त्यांना आणखी २२ महिन्याचे व्याज व मुळ रक्कम ३०,०००/- असे सर्व मिळुन १,२९,००० रुपये परत कर नाहीतर तुला व तुझ्या कुंटुबातील लोकांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. शिवाय, फिर्यादी त्यांची पत्नी व आईस शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली होती.

फिर्यादी यांचे बँक खात्यात सातव्या वेतन आयोगाची रक्कम जमा झाली होती त्याच दिवशी आरोपी सतिशकुमार भाटी याने फिर्यादी यांचेकडून सिक्युरिटी म्हणून घेतलेला चेकचा गैरवापर करुन बँकेत सादर करुन फिर्यादी यांचे संमती शिवाय स्वताःचे नावाने १९,००० रुपये जबरदस्तीने काढून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. आरोपी सतिश भाटी याच्याकडे सावकारीचा परवाना नसताना तो व्यवसाय करत असल्याने त्याचविरुध्द खडक पोलिस स्टेशन पुणे गुरनं १८६ / २०२२ भा. दं. वि. कलम ४२०, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ व सावकारी अधिनियम सन २०१४ कलम ३९, ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

युनिट-१ गुन्हे पुणे शहर चे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी आरोपी सतिश बन्सिलाल भाटी (वय ५४ रा. मेमजादे बिल्डिंग, प्लॅट नं १ पहिला मजला, हरका नगर भवानी पेठ पुणे) याचा शोध घेवून त्यास रोजी ताब्यात घेतले. स्नेहा जोशी उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर ( २ ) पुणे व सहायक सह अधिकारी एच. ए. पाटील व राजन वनशिव यांचेसह आरोपीचे दुकानाची व घराची पाहणी केली तेव्हा त्याचे दुकानामध्ये वेगवेगळया बँकेचे एकूण ६४ चेक त्यावर खातेदार यांची सही असलेली वेगवेगळया बँकेचे एकूण १६ पासबुक, पाचशे रुपये दराचे तीन व शंभर रुपये दराचे नऊ असे एकूण १२ नॉन ज्युडिशियल स्टॅम्पपेपर, रजिस्टर व इतर कागदपत्र मिळून आली आहेत. एक मोबाईल फोन असा दहा रुपयाचा ऐवज पोलिसांनी तपासकामी जप्त करुन ताब्यात घेतलेला आहे.

आरोपीकडे मोठया प्रमाणात चेक, पासबुक, स्टॅम्पपेपर मिळून आले आहे त्याने आणखी कोणाला व्याजाने पैसे दिले आहेत ? त्याचे इतर साथीदार कोण आहे ? याबाबत पोलिस तपास करत आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रंमाक - ९ पुणे यांचे न्यायालयात आरोपीस हजर केले असता न्यायालयाने त्यास २७/०६/२०२२ रोजी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. अशाप्रकारे आरोपीने अनेक नागरिकांना व्याजाने पैसे दिले आहेत त्या नागरिकांनी गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर येथे संपर्क साधावा तसेच बेकायदेशीर व्याजाने पैसे देणारे सावकार यांचेविरुध्द तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुणे यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, संदीप कर्णिक पोलिस सह आयुक्त पुणे शहर, पोलिस उप आयुक्त (आर्थिक व सायबर), भागश्री नवटक्के, अतिरिक्त कार्यभार, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्रीनिवास घाडगे पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे, गजानन टोणपे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे -१, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदिप भोसले, पोलिस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अजय जाधव पोलिस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर शशिकांत दरेकर दत्ता सोनवणे अभिनव लडकत महिला पोलिस अंमलदार रुखक्साना नदाफ यांनी केली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : बापरे! बेकायदेशीर सावकाराचा व्याजदर पाहा; घरात आढळले...
क्राईमनामा Live : बापरे! बेकायदेशीर सावकाराचा व्याजदर पाहा; घरात आढळले...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhhYuKXDREekoPwFXWGMdtcEe0ibQGoulKOov5D4lBnAJu-SzFxLit9M9OWF3wXUxc-2KjJpL1bJwAbyKGhOCIT8s-ZT_uXY8OFSaSjGAYi7nVR5ikjeTfGCPbSSb7_8pMOR7C1AGcWTK3HFSg4l4ryMdDU2bqh366ZoFjBtcayEgEO-ku21BfCHgl0/s320/n398186596a90c8f38b947f85c7b9937b433a687a4a57e44639a35d3d35535e5c90f6a8ffe.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhhYuKXDREekoPwFXWGMdtcEe0ibQGoulKOov5D4lBnAJu-SzFxLit9M9OWF3wXUxc-2KjJpL1bJwAbyKGhOCIT8s-ZT_uXY8OFSaSjGAYi7nVR5ikjeTfGCPbSSb7_8pMOR7C1AGcWTK3HFSg4l4ryMdDU2bqh366ZoFjBtcayEgEO-ku21BfCHgl0/s72-c/n398186596a90c8f38b947f85c7b9937b433a687a4a57e44639a35d3d35535e5c90f6a8ffe.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/06/live_39.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/06/live_39.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content