मुंबईः अभिनेता सलमान खान याला जीवे ठार मारू अशा धमकीचे पत्र आले आहे. वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील त...
मुंबईः अभिनेता सलमान खान याला जीवे ठार मारू अशा धमकीचे पत्र आले आहे. वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. त्या पत्राची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी सलमान खान याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
सलमान खानचे वडील सलीम खान हे सुरक्षारक्षकासोबत मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा सलीम खान यांच्या एका सुरक्षा रक्षकाला एका बेंचवर एक पत्र दिसले. सुरक्षा रक्षकाने ते पत्र सलीम खान याना दिले. त्या पत्रात सलमानला 'मुसेवाला सारखे करू' असे लिहिले होते. त्या पत्र प्रकरणी सलीम खान यांनी याची माहिती वांद्रे पोलिसांना दिली.
दरम्यान, धमकीचे पत्र प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. ते पत्र कोणी पाठवले, पत्र पाठवणाया व्यक्तीचा गुन्हेगारी जगताशी संबंध आहे का? यांचा तपास वांद्रे पोलिस करत आहेत.
COMMENTS