सोलापूर: ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी , मुळेगाव व गुळवंची तांडा येथे अवैध गावठी दारूच्या हातभट्टया उद्ध्वस्त ...
सोलापूर: ऑपरेशन परिवर्तन
अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी,
मुळेगाव व गुळवंची तांडा येथे अवैध गावठी दारूच्या हातभट्टया उद्ध्वस्त
करण्यात आल्या आहेत. पाच लाख २० हजार ८०० रुपयांचे २४ हजार ८०० लीटर गूळमिश्रित
रसायन, १२० प्लॅस्टिक व ४
लोखंडी बैरल जागेवरच नष्ट केले आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात अवैधरीत्या हातभट्टी दारू
गाळणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायापासून परावृत्त करुन त्यांच्याकरिता इतर व्यवसाय
करण्याच्या अनुषंगाने ऑपरेशन परिवर्तन मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार सोलापुर
तालुका पोलिस स्टेशनचे हद्दीत वडजी तांडा,
मुडेगाव व गुळवंची येथे अवैधरित्या चोरुन चालणार्या हातभट्टी दारुच्या
भट्ट्या उध्वस्त करण्यासाठी उपविभागिय पोलिस अधिकारी अधिकारी अमोल भारती यांच्या
मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली
पोलिस निरीक्षक अरूण फुगे व पथकाने केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS