पुणे : भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात सोमवारी (ता. 16) जोरदार गोंधळ झाला. या कार्यकर्मात आंदोलन कर...
पुणे : भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या
कार्यक्रमात सोमवारी (ता. 16) जोरदार
गोंधळ झाला. या कार्यकर्मात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला
पदाधिकाऱ्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारल्याप्रकरणी भाजपच्या तीन
कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
बालगंधर्व
रंगमंदिर सभागृहात सोमवारी स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम ठरलेला होता. त्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर
आधारित पुस्तक प्रकाशनासाठी स्मृती इराणी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात
पोहोचल्या. यावेळी तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी
महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत घोषणाबाजीला सुरुवात केली. राष्ट्रवादी
काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच भाजप कार्यकर्तेही
आक्रमक झाले. या दरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला
कार्यकर्त्यांना ताब्यात घेत तेथून बाहेर नेत होते. मात्र, त्याच दरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात
सुद्धा कैद झाली आहे.
या प्रकरणात आता
भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शांततेच्या मार्गाने महागाईच्या विरोधात आपला विरोध
प्रकट करीत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना
भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही
परिस्थितीत एक पुरुष महिलेला मारहाण करतो हे अजिबात स्वीकारार्ह नाही. या अशा
प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.'
COMMENTS