प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे पिंपळगाव जोगा येथे क्रांतिसुर्य भिमविकास नवतरूण मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक १६ मे २०२२ रोजी बुध्दजयंती साजरी...
प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे
पिंपळगाव जोगा येथे क्रांतिसुर्य भिमविकास नवतरूण मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक १६ मे २०२२ रोजी बुध्दजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जि.प. सदस्य पुणे अंकुशशेठ आमले, बुधाजी शिंगाडे सदस्य_ आरोग्य गाभा समिती पुणे, संतोषदादा मेंगाळ अध्यक्ष शिवमावळा युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष जालिंदर घाडगे तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष पंकज हांडे, सचिन खरात, तसेच पंकज हांडे यांनी मंडळाला महामानवाच्या प्रतिमा दिल्या. कार्यक्रम अतिशय सुंदर पध्दतीने साजरा
करण्यात आला. भविष्यात लागणाऱ्या निधीसाठी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी सदस्य हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी कठीण परिश्रम घेतले. यावेळी मंडळाचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गावातील अनेक नागरिक व पंचक्रोशितील अनेक बौध्द बांधव उपस्थित होते.
COMMENTS