हैदराबाद: बच्चुपल्ली येथे एक १७ वर्षाच्या मुलाने १३ वर्षाच्या बहिणीवर गेल्या दोन वर्षांत अनेकदा बलात्कार केला असून, मुलगी गरोदर राहिल्यानं...
हैदराबाद: बच्चुपल्ली येथे एक १७ वर्षाच्या मुलाने १३ वर्षाच्या बहिणीवर गेल्या दोन वर्षांत अनेकदा बलात्कार केला असून, मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिस निरीक्षक के नरसिम्हा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून, त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.'
मुलीने तिच्या आईला आपल्याला गेल्या काही महिन्यांपासून मासिक पाळी येत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीला गचीबोवली येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ती गर्भवती असल्याचे समजल्यानंतर मोठा धक्काच बसला. यानंतर मुलीने आईला सांगितले की, तिचा भाऊ तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. आईने तिला सिकंदराबादमधील दुसऱ्या खासगी रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी नेले. परंतु, डॉक्टरांनी तिला चाइल्डलाइनशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. चाइल्डलाइनच्या माध्यमातून मुलीला शहरातील भरोसा केंद्रात हलवण्यात आले आहे समुपदेशनानंतर मुलीला तिच्या पालकांसह बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे.
मुलगा इंटरमिजिएटच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे तर मुलगी नववीच्या वर्गात शिकत आहे. त्यांचे पालक शहरातील खासगी कंपनीत नोकरीला आहेत. भावाची भीती वाटत असल्यामुळे तिने यासंदर्भात आईवडिलांना काही सांगितले नसल्याचे तिने सांगितले.
COMMENTS