प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे क्राईमनामा Live : जुन्नर तालुका बौद्धजन संघ,मुंबई, आयोजित भगवान गौतम बुद्ध, व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संय...
प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे
क्राईमनामा Live : जुन्नर तालुका बौद्धजन संघ,मुंबई, आयोजित भगवान गौतम बुद्ध, व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्ताने सोमवारी १६ मे २००२रोजी जुन्नर येथे आयोजित एक भव्य कार्यक्रमात जुन्नर तालुक्यातील, समाजहितार्थ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला, त्यांमध्ये, पांगरीमाथा, बल्लाळवाडी जुन्नर येथील अनेक निराधार आजी-आजोबांची निःस्वार्थ सेवा करणारे राजाराम पाटील जेष्ठ नागरिक आधार केंद्र (वृद्धाश्रमाचे ) संस्थापक अध्यक्ष श्री.विवेक तांबोळी यांचाही जुन्नर तालुक्याचे आमदार श्री. अतुलशेठ बेनके, व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.संजयशेठ काळे या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला...
" हा सन्मान माझा एकट्याचा नसून, राजाराम पाटील वृद्धाश्रमाचे सर्व संचालक,हितचिंतक, देणगीदार,सेवक-कर्मचारी ह्या सर्वांच्या वतीने स्विकारत असल्याचे,कार्यक्रमप्रसंगी श्री. तांबोळी यांनी नम्रपणे नमूद केले.
🙏खूप खूप अभिनंदन तांबोळी साहेब,आणि ,सर्व संचालक मंडळाचे !!🙏💐🤝💐
COMMENTS