पाटणा (बिहार): अपत्यप्राप्तीच्या नावाखाली एक भोंदू बाबा महिलांवर बलात्कार करत होता. एका पतीने खिडकीतून आता डोकावून पाहिल्यानंतर पत्नीवर बल...
पाटणा (बिहार): अपत्यप्राप्तीच्या नावाखाली एक भोंदू बाबा महिलांवर बलात्कार करत होता. एका पतीने खिडकीतून आता डोकावून पाहिल्यानंतर पत्नीवर बलात्कार करत असल्याचे आढळून आल्यामुळे भोंदूबाबाचा भांडाफोड झाला आहे.
मधेपुरा जिल्ह्यातील आलमनगर पोलिस स्टेशनमध्ये भोंदूबाबाविरोधात विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
चिल्का बाबा उर्फ कैलाश पासवान असे भोंदूबाबाचे नाव आहे. भोंदूबाबा ज्यांना मुल-बाळ होत नाही, अशा महिलांचा शोधात असायचा. महिलांना तंत्र-मंत्राच्या नावावर तो बंद खोलीत नेत होता आणि त्यांच्यासोबत बलात्कार करत होता. जर एखादी महिला तिच्या पतीसोबत आली तर त्याची झोपण्याची व्यवस्था बाहेर करत होता. अशाच एका पतीला त्याच्या पत्नीसोबत होत असलेला प्रकार दिसला आणि हे प्रकरण समोर आले.
पीडित दाम्पत्याने सांगितले की, 'लग्नाला बरीच वर्ष होऊनही मुल झाले नव्हते. यादरम्यान गावातील एका महिलेने त्यांना चिल्का बाबा बाबत सांगितले. नबाबाच्या तंत्रा-मंत्राने तिला दोन मुली झाल्या. दोघांनीही महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्याकडे जाऊ लागले. रात्री तंत्रमंत्राच्या नावावर चिल्का बाबा तिच्या पतीला घराबाहेर झोपण्यास सांगत होता आणि महिलेला खोलीमध्ये घेऊन जात होता. यानंतर बाबा प्रसादाच्या नावावर नशेचा पदार्थ खाऊ घालत होता आणि बेशुद्ध झाल्यावर बलात्कार करत होता. नशेत असल्यामुळे काही समजत नव्हते. अनेक महिने तंत्रमंत्राच्या नावावर बाबा बलात्कार करत राहिला. बुधवारी रात्रीही बाबाने महिलेला फोन करून बोलवले होते. इतर रात्रींप्रमाणे त्या रात्रीही त्याने तसेच केले. पण महिलेच्या पतीची अचानक झोप उघडली. त्याला दिसले की, त्याचे हातपाय बांधले आहेत. त्याने कसेतरी हातपाय सोडवले आणि बाबाच्या रूममध्ये डोकावून पाहिले तर बाबा त्याच्या पत्नीवर बलात्कार करत होता. हे बघून त्याला धक्का बसला. दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देत चिल्का बाबा तेथून फरार झाला. चिल्का बाबाने पंजाबच्या महिलांसोबतही असेच कृत्य केले आहे. ज्यामुळे वाद झाला होता. पण कोणतीही कारवाई झाली नाही.
याप्रकरणी पोलिस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले की, 'पीडित दाम्पत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस घटनेची चौकशी करत आहेत. लवकरच भोंदू बाबाला अटक केली जाईल. हा भोंदू बाबा आधीही तुरूंगात गेला होता. पुढील तपास सुरू आहे.'
COMMENTS