सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंज...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे ( बांगरवाडी ) या अभियांत्रिकी महाविद्यालयात "कॉम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन" मार्फत नुकताच विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके व डी आर डी ओ चे अधिकारी उत्तम माळूंजे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, प्रा.निर्मल कोठारी, प्रा.प्रवीण सातपुते, प्रा.अमोल खतोडे, प्रा.रामेश्वर डोखे, नॅक समन्वयक डॉ.संदीप नेहे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर, रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले आदी उपस्थित होते.
पुणे येथे डी आर डी ओ मध्ये इंजिनियर पदी कार्यरत असलेले उत्तम माळूंजे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उत्तम माळूंजे म्हणाले की, स्टुडंट असोसिएशन चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना संगणक,माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रम त्याचबरोबर अतिरिक्त कौशल्ये आणि ज्ञान आत्मसात करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हा आहे.
छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात.
मुलाखत कौशल्ये कशी हस्तगत करायची, लिडरशिप, टीम वर्क, ऐनवेळचे नियोजन, परिस्थितीनुरूप कामामध्ये झालेले बदल या सर्वच बाबींचा अनुभव विद्यार्थ्यांना आयोजित केलेल्या विविध उपक्रमांतून मिळत असतो.विद्यार्थ्यांनी मनामध्ये न्यूनगंड न बाळगता ध्येयपूर्ती साठी स्वतःला झोकून द्यावे. आपल्यामध्ये असलेल्या न्यूनता,सकारात्मक गोष्टी ओळखून त्यानुसार वाटचाल केली तर यशाचा मार्ग नक्कीच सुखकर होईल असे यावेळी माळूंजे म्हणाले.
या स्टुडंट असोसिएशनच्या मार्फत विद्यार्थ्यांना आपल्यातील अंगभूत कला गुणांना तसेच कौशल्यांना वाव देण्यास मदत होते.तसेच असोसिएशन मार्फत "शिक्षक दिन" आणि "अभियंता दिवस" सारखे दिवस साजरे करतो.नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी “फ्रेशर्स फंक्शन” आयोजित केले जाते. अंतिम वर्षाचा निरोप समारंभ "फेअरवेल फंक्शन" आयोजित केले जाते.
असोसिएशन मार्फत बहुविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे विभागप्रमुख प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी सांगितले.
यावेळी प्रश्नमंजुषा,गेमिंग तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.भूषण बोऱ्हाडे, तसेच नियोजन सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले.
सूत्रसंचालन विद्यार्थी वैभव भुजबळ, प्रतीक्षा अनंत व मुस्कान सय्यद यांनी तर आभार प्रा. गणेश जाधव यांनी मानले.
COMMENTS