पुणे : एका उच्चशिक्षित महिलेने दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानसी यादव (वय 27, मूळ रा. मध्य प्रद...
पुणे : एका उच्चशिक्षित महिलेने दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानसी यादव (वय 27, मूळ रा. मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
घटस्फोट देण्याची मागणी करणाऱ्या पती, सासू, सासऱ्याच्या छळामुळे महिलेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आत्महत्या करणारी महिला पुण्यात शिक्षणासाठी आली होती. दरम्यान, आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी पती, सासू, सासरे तसेच तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS