संपादक- सतिश शिंदे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जुन्नर तालुक्यातील सुराळे येथे सा...
संपादक- सतिश शिंदे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जुन्नर तालुक्यातील सुराळे येथे साजरी करण्यात आली.
यावेळी बौध्द अनुयायी यांच्या वतीने सुराळे येथे सभा आयोजित केली होती, तसेच कार्यक्रमाच्या सुरूवातीला सतिश शिंदे, शरद शिंदे, प्रज्वल शिंदे व गौतम शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून बुध्दपुजा पाठ घेण्यात आला.
यानंतर सभेला उद्देशून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर मान्यवरांनी आपले मनोगत व अभिवादन केले.
श्रेयश शिंदे, क्षितिज शिंदे, किर्ती खरात, आश्विनी शिंदे व शरद शिंदे या मान्यवरांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर गौतम शिंदे, प्रज्वल शिंदे, सतिश शिंदे, वैभव खरात, प्रिती शिंदे, शुभांगी शिंदे, सिंधू शिंदे, हौसाबाई शिंदे, श्रावणी शिंदे आदि ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन शरद शिंदे, प्रज्वल शिंदे, गौतम शिंदे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन शरद शिंदे यांनी मानले.
COMMENTS