पुणे: शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशन (Shikrapur Police Station) समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम ...
पुणे: शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशन (Shikrapur Police Station) समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून, शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञातावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्रापूर येथील मारुती मंदिराची साफसफाई करणारे शंकर जुवर हे सकाळच्या सुमारास मंदिरात आले असताना त्यांना दानपेटी जवळ काही पैसे पडल्याचे दिसले. त्यावेळेस त्यांनी पाहिले असता दानपेटीचे कुलूप तुटलेले आणि पत्रा उचकटला असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस नाईक प्रतीक जगताप, अमोल दांडगे, सचिन होळकर, निखिल रावडे यांसह आदींनी घटनास्थळी जात पाहणी केली.
याबाबत शंकर रघुनाथ जूवर (वय 71 वर्षे रा. भैरवनाथ मंदिर समोर शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. अंतरगाव ता. कळंब जि. यवतमाळ) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश करपे हे करत आहेत.
COMMENTS