Weather Alert: 70 च्या स्पीडने येतंय तुफान, 21 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट | CrimeNama
Loading ...

Weather Alert: 70 च्या स्पीडने येतंय तुफान, 21 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट

  मागच्या काही दिवसांपासून अति प्रचंड उकाडा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांनी आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मह...

 




मागच्या काही दिवसांपासून अति प्रचंड उकाडा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांनी आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या महाराष्ट्रासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे.

राज्यात आता उष्णतेची लाट पूर्णपणे ओसरली असून, तापमानात मोठी घसरण झाली आहे. इतकंच नाही, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांत आता मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

48 तास राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पाऊस पडून गेल्यावर गारवा जाणवण्याऐवजी उष्णता जास्त वाढत आहे. ऊन पावसाचा हा खेळ कधी थांबणार आणि मान्सूनचा पाऊस कधी येणार याची वाट शेतकरीच नाही तर सर्वसामान्य माणूस देखील पाहात आहे.

नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि मालेगाव परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर परिसरातही ढगांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात पावसाचा जोर चांगला असेल, तर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील

विदर्भ आणि तापी खोऱ्यातील काही भाग सोडला तर राज्यातील बहुतांश भागांत आता तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. गंगापूर आणि उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशांप्रमाणेच महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पारा ३३ ते ३६ अंशाच्या आसपास स्थिरावला आहे. पुढील किमान एक आठवडा तरी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला नाही.




पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वारे केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये दाखल होतील. केरळमध्ये मोसमी वाऱ्यांच्या आगमनाची स्थिती लांबणीवर गेली आहे. यावेळी एल निनोमुळे त्याला मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. मोसमी वाऱ्यांच्या आगमनापूर्वीच एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे, नौतपा वादळाचा प्रभाव दोन ते तीन दिवसांसाठी लांबणीवर पडला आहे.




भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे नैऋत्य, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये, तसेच आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात पुढे सरकण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता, वायव्य उत्तर प्रदेशात एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे.




बुधवारपासून एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे ५ जूनपर्यंत पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात विखुरलेला पाऊस, गारपीट आणि ताशी ७० किमी वेगापर्यंतचे वारे वाहू शकतात. या नवीन पश्चिमी वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे, जम्मू आणि काश्मीर ते उत्तराखंडपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नोएडा, गाझियाबाद, आग्रा आणि मथुरा भागात अलर्ट दिला आहे.




महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ताशी 50 किमी वेगानं वारे वाहू शकतात आणि त्यासोबत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.राज्यात आता उष्णतेची लाट पूर्णपणे ओसरली असून, तापमानात मोठी घसरण झाली आहे. इतकंच नाही, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांत आता मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरला आहे.






COMMENTS

Name

Agriculture,83,Ahmednagar,86,Amaravati,20,Aurangabad,39,Breakin,1,Breaking,4357,Buldhana,17,Chandrapur,2,Cooking,4,Crime,1609,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,77,Gadchiroli,5,Health,469,India,819,Jalgaon,34,Jalna,19,Kolhapur,27,Lifestyle,348,Maharashtra,1857,Mumbai,454,Nagpur,57,Nashik,73,Politics,650,Pune,1966,Raigad,27,Ratnagiri,20,Sangali,36,Satara,50,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,68,Technology,39,World,77,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: Weather Alert: 70 च्या स्पीडने येतंय तुफान, 21 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट
Weather Alert: 70 च्या स्पीडने येतंय तुफान, 21 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhmXqXRacLatZUUdlAsCPvMAIIPCaJUbEHT1fYpor14MhgsufBvKiqhAmV5PJ0N6171cDVN0st4V7Hha10iL_paI9HPmvL4PpzooDJMg94YjtUKgQsFqvNSeyDWVVXaL5dPGFtw-dm4vqPkgX3oZ266bwUjRkwqacn7Cn5BfggAivLFfYAqsxGEEqthrOQ/s320/IMG_20260603_151001.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhmXqXRacLatZUUdlAsCPvMAIIPCaJUbEHT1fYpor14MhgsufBvKiqhAmV5PJ0N6171cDVN0st4V7Hha10iL_paI9HPmvL4PpzooDJMg94YjtUKgQsFqvNSeyDWVVXaL5dPGFtw-dm4vqPkgX3oZ266bwUjRkwqacn7Cn5BfggAivLFfYAqsxGEEqthrOQ/s72-c/IMG_20260603_151001.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/weather-alert-70-21_0857940129.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/weather-alert-70-21_0857940129.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content