मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या स्तुती सोनवणे हिने फजल मोहम्मद खान या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. फजल मोहम्मद खान याल...
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या स्तुती सोनवणे हिने फजल मोहम्मद खान या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. फजल मोहम्मद खान याला पोलिसांनी लोअर परळ येथून अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
स्तुती सोनवणेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘माझ्या मुलीबद्दल चुकीचे रंगवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. स्तुती अभ्यासात अतिशय हुशार होती, ती मानसिक तणावात असल्याचे आम्हाला जाणवले नाही. अभ्यासासाठी तिच्या खोलीत गेली होती, त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. मात्र ज्या गोष्टींमुळे ती तणावात होती, त्याबाबत तिने आम्हाला कधीच सांगितले नाही. सांगितले असते तर त्यातून मार्ग काढता आला असता. स्तुतीने केलेल्या आरोपांची चौकशी होऊन आरोपीला सजा झाली पाहिजे.’
फजल मोहम्मद खान (वय ३१) याला मुंबई पोलिसांनी लोअर परळ येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्तुती आणि फजल मोहम्मद खान यांची ओळख एका डेटिंग अॅपवरून झाली होती. सुमारे वर्षभरापासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. सुरुवातीला त्यांचे नाते खूप चांगले होते. मात्र काही महिन्यांनी त्यांच्यात वादविवाद व्हायला लागले. फजल मोहम्मद खान स्तुतीला मानसिक त्रास देत असल्याचे तिने नोटमध्ये लिहून ठेवले आहे.
दरम्यान, स्तुतीचे मित्र-मैत्रिणीही तिला एक दिवस तू नक्की फ्रीजमध्ये सापडशील, असे टोमणे मारायचे. मित्रमैत्रिणींच्या टोमण्यांनाही स्तुती कंटाळली होती. एकाचवेळी फजलचा त्रास आणि मैत्रमैत्रिणींचे टोमणे अशामुळे ती त्रस्त होती. अखेर तिने मंगळवारी सकाळी अँटॉप हिलमधल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले.


COMMENTS