गेमच्या नादात तीन बहिणींनी आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा! | CrimeNama
Loading ...

गेमच्या नादात तीन बहिणींनी आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा!

  उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाल्याचं वृत्त...

 


उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाल्याचं वृत्त आहे. सोसायटीच्या लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चकित करणारी बाब उघडकीस आली आहे.

पोलिसांनी DVR जप्त केल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिफ्टमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेच्या वेळी सर्व हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार, तिघी मुली खाली पडल्यानंतर त्यांचे वडील चेतन, त्यांची पत्नी सुजाता आणि टीना उर्फ नाजनीन लिफ्टमधून 9 व्या मजल्यावर आले. ज्यावेळी मुलींनी बाल्कनीतून उडी मारली, त्यावेळी वडील त्यांच्या पत्नींसह त्याच लिफ्टमधून ग्राउंड फ्लोरवर आले आणि नंतर सर्वजण घरातून बाहेर निघाले.


लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?


लिफ्टमधून वर आल्यानंतर काही वेळाने, टीना उर्फ नाजनीन लिफ्टने पुन्हा नवव्या मजल्यावर गेली. खाली तिन्ही मुलींचे विद्रूप अवस्थेत मृतदेह पडले होते. तोपर्यंत सोसायटीतील सगळे लोक खाली जमले होते. सोसायटीतील लोकांनी चेतन यांना सांगितलं की, मुलींच्या मृतदेहावर कापड तरी घाला. यानंतर, चेतन आणि सुजाता लिफ्टमधून कापड आणण्यासाठी वर जातात. नवव्या मजल्यावर लिफ्ट ओपन झाल्यानंतर, टीना उर्फ नाजनीन तिच्या तीन वर्षांच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेली दिसली आणि तिच्या हातात कापड सुद्धा होतं.

त्यानंतर, चेतना, सुजाता आणि टीना यांचं लिफ्टमध्ये मोठं भांडण होतं. दरम्यान, त्यापैकी कोणीही लिफ्टचे बटण दाबू शकत नाही आणि लिफ्ट 9 व्या मजल्यावरच थांबली. थोड्या वेळाने, चेतनने लिफ्टचं बटण दाबलं. यावेळी लिफ्टमध्ये जे काही घडतं ते अतिशय धक्कादायक होतं. तिघांमध्ये भांडण सुरू असताना टीना अचानक सुजाताच्या कानाखाली मारते. तेव्हा चेतन रागाने दोघांवर हात उगारतो. तो दोघांनाही गप्प राहण्यास सांगत असल्याचं त्याच्या कृत्यावरून स्पष्ट होत आहे.


यानंतर, तिघेही लिफ्टमधून ग्राउंट फ्लोरवर येतात. लिफ्टच्या या घटनेत अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत. चेतन आणि त्याच्या पत्नींमध्ये भांडण का झाले? अपघातापूर्वी चेतनच्या अपार्टमेंटमध्ये असं काही घडले होते का ज्यामुळे ही दुर्घटना घडली? पोलिसांनी या घटनेचा डीव्हीआर आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,77,Ahmednagar,86,Amaravati,19,Aurangabad,37,Breakin,1,Breaking,4270,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,3,Crime,1585,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,65,Gadchiroli,5,Health,461,India,804,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,27,Lifestyle,343,Maharashtra,1815,Mumbai,445,Nagpur,56,Nashik,71,Politics,629,Pune,1951,Raigad,27,Ratnagiri,19,Sangali,36,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,67,Technology,39,World,72,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: गेमच्या नादात तीन बहिणींनी आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा!
गेमच्या नादात तीन बहिणींनी आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSA81P2u-acGXYfPkr8tN8fnmpNx0nNqDUgn_rjxlNOi8PwMLDCOiQpWXUNykN-1uoOgQ-JrRaJ9r7kG6qJJmJP-gzXzeyUIc0gOAezMGvs4-T3aPszlc5zBVq-znley9ZcqryEkWIjYkLYDKZb-kyl_qQNMKwO2PsbQZseFVxNkERTLjv-rmupvg4C2I/s320/1001880534.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSA81P2u-acGXYfPkr8tN8fnmpNx0nNqDUgn_rjxlNOi8PwMLDCOiQpWXUNykN-1uoOgQ-JrRaJ9r7kG6qJJmJP-gzXzeyUIc0gOAezMGvs4-T3aPszlc5zBVq-znley9ZcqryEkWIjYkLYDKZb-kyl_qQNMKwO2PsbQZseFVxNkERTLjv-rmupvg4C2I/s72-c/1001880534.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_11.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_11.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content