पुणे बेंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्याजवळ खासगी प्रवासी बसवर दरोडा टाकून सव्वा कोटी किंमतीची ६० किलो चांदी लुटल्याने ...
पुणे बेंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्याजवळ खासगी प्रवासी बसवर दरोडा टाकून सव्वा कोटी किंमतीची ६० किलो चांदी लुटल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने सराफ वर्गात खळबळ उडाली आहे.
सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. पेठ वडगाव पोलिस ठाण्यात या गुन्हयाची नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनसार कोल्हापूरातील व्यापाऱ्यांचे सोने चांदीचे दागिने अंगडिया सर्व्हिसच्यावतीने मुंबईला पाठवण्यात येतात. अंगडियाची सव्वा किलो चांदी घेऊन अशोक ट्रॅव्हल्सची प्रवासी मुंबईकडे चालली होती. बसमध्ये तीन संशयित प्रवासी बसले होते. किणी टोल नाक्याच्या परिसरात बस पोचताच एका संशयिताने बस चालकाच्या गळ्याला चाकू लावून बस थांबवण्यास भाग पाडले. बस थांबताच मागून आलेल्या कारमधून काही जण उतरले. त्यांनी बसच्या डिकीतील अंदाजे सव्वा कोटी रुपये किंमतीची ६० किलो चांदीचे दागिने, एक तोळा सोने, रोख रक्कम असा सव्वा कोटीचा ऐवज घेऊन ते पसार झाले.
या घटनेची माहिती चालकाने ट्रॅव्हल्स मालकाला दिली. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देताच पेठ वडगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक भरत पाटील पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चोरट्याचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पुढे आली आहे.


COMMENTS