एका महिला कॉन्स्टेबलला एका अनोळखी नंबरवरून फोन आल्याची घटना घडली आहे. दीपाली सिंगने कॉल घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने एका पुरुषाचा आवाज आला. ...
एका महिला कॉन्स्टेबलला एका अनोळखी नंबरवरून फोन आल्याची घटना घडली आहे. दीपाली सिंगने कॉल घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने एका पुरुषाचा आवाज आला. त्याने आपण राजेश अशी ओळख सांगितली होती.
एवढंच नाहीतर त्याने दीपालीशी गैरवर्तन केलं. इतकेच नाही तर आरोपीने व्हॉट्सअॅपवर महिला कॉन्स्टेबलला अश्लील फोटोही पाठवले होते. आरोपीने वाईट वर्तन करणे कधीच थांबवले नाही, तेव्हा दीपाली सिंग नाराज झाली आणि त्याने यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिला कॉन्स्टेबल दीपाली सिंगच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना आग्राच्या खंडौली पोलीस ठाणे परिसरातील आहे.
नेमकं काय घडलं?
दीपाली सिंग म्हणाली की, तिला 6 डिसेंबर रोजी पहिला फोन आला होता. तेव्हा ती ड्युटीवर होती, तिने सांगितलं की, तिला एकदाच नाहीतर अनेकदा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत: राजेश अशी ओळख सांगितली. आरोपीने तिला अश्लील फोटो पाठवले होते.
आरोपीच्या संवादाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड
दीपाली सिंग यांच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडे आरोपीशी संवाद केलेले संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते. तिने पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्डिंगचे स्क्रीनशॉट आणि अश्लील फोटो देखील दिले आहेत. या प्रकरणात तक्रारीच्या आधारे पोलीस, ठाण्याच्या अधिकाऱ्याने अहवाल नोंदवत तपास सुरु केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक काम करत आहेत आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरु करण्यात आला आहे.
या संदर्भात एसीपी एतमादपूर यांनी सांगितलं की, या घटनेच्या संदर्भात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. तसेच तपास सुरु असून गरज पडल्यास सायबर सेलचा सल्ला देखील घेतला जाणार आहे.


COMMENTS