दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या हत्येचा रचला कट, गुन्हा लपवण्यासाठी केले भयंकर | CrimeNama
Loading ...

दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या हत्येचा रचला कट, गुन्हा लपवण्यासाठी केले भयंकर

  धाराशिव (Dharashiva) जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कंडारी ते सोनारी रस्त्यावर झालेल्या एका संशयास्पद अपघातामागे खुनाचे गंभीर षडयंत्र असल्...

 


धाराशिव (Dharashiva) जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कंडारी ते सोनारी रस्त्यावर झालेल्या एका संशयास्पद अपघातामागे खुनाचे गंभीर षडयंत्र असल्याचे उघड झाले आहे.

जुन्या भांडणाच्या रागातून दोन मित्रांनी आपल्याच 35 वर्षीय मित्राच्या डोक्यात जड वस्तूने वार करून क्रूरपणे खून केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. आंबी पोलिसांनी या घटनेत तात्काळ सूत्रे फिरवत, खुनाचा (Murder) गुन्हा नोंदवून दोन्ही संशयित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे कंडारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


मयत मोतीराम जाधव हे सोमवार रात्री 9 च्या सुमारास कुटुंबासह घरी जेवण करत होते. त्याच वेळी त्यांचे मित्र विष्णु कालीदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे हे मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी मोतीराम यांना पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी केली आहे, तिकडे जेवण करायला चल, असे सांगून त्यांना चालू जेवणाच्या ताटावरून उठवले आणि मोटारसायकलवर बसवून सोबत घेऊन गेले. रात्री 10 च्या सुमारास मोतीराम यांना घेऊन गेलेल्या दोन मित्रांपैकी विष्णु तिंबोळे हा एकटाच मोतीराम यांच्या घरी परतला आणि त्याने कंडारी ते सोनारी रोडवर पप्पु रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाल्याचे सांगितले.विष्णु तिंबोळेने दिलेल्या माहितीनुसार मयताची पत्नी सोनाली जाधव आणि आई रतन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, मोतीराम जाधव हे रस्त्यावर पडलेले होते. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती, चेहरा ठेचला गेलेला होता आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी सांडलेल्या रक्तावर पाणी आणि माती टाकलेली दिसून आली. अपघातात तिघांपैकी केवळ मोतीराम यांचाच अपघात कसा झाला, असा जाब पत्नीने विचारला असता आरोपी मित्रांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे अपघाताबाबतचा संशय बळावला. या घटनेनंतर सोनाली जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोतीराम जाधव, विष्णु तिंबोळे आणि योगेश तिंबोळे यांच्यात जुन्या भांडणावरून वाद होता. हे भांडण तात्या रावखंडे व पप्पु रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला होता, ज्यात तात्या रावखंडे हे जखमी झाले होते. जुन्या भांडणाच्या रागातून विष्णु तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी मोतीराम जाधव यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांचा खून केला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.


घटनेची माहिती मिळताच आंबी पोलीस ठाण्याचे सपोनि गोरक्ष खरड व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीतील गंभीर आरोप आणि घटनास्थळावरील परिस्थिती (रक्तावर माती टाकणे, अपघाताबाबतचा संशय) लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. आंबी पोलिसांनी आरोपी विष्णु कालीदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर काही तासांतच दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हा अपघात नसून, पूर्ववैमनस्यातून केलेला खून आहे का, डोक्यात कोणत्या जड वस्तूने मारले गेले, तसेच तात्या रावखंडे यांना झालेल्या दुखापतीचा आणि खुनाचा काय संबंध आहे, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3787,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1248,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,565,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,299,Maharashtra,1711,Mumbai,416,Nagpur,49,Nashik,58,Politics,607,Pune,1875,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,68,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या हत्येचा रचला कट, गुन्हा लपवण्यासाठी केले भयंकर
दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या हत्येचा रचला कट, गुन्हा लपवण्यासाठी केले भयंकर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPe51iLforN3wKFWLiiCP5ZSnk76nxKB6MesRltpbiXCu__ee6i3O66xPW695u814zjq39TH460-Q-TxUyrWqwBFQke9CMBUXpOJtgoyjIqNhVdIrK-D_iDXZkNlJc7Th3ZUW-0zo_X3k-fMWr6fQmcKWjLvl8IiVYc-2ponlVSiHCJl3t7-Ii_OGmHuw/s320/1001650279.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPe51iLforN3wKFWLiiCP5ZSnk76nxKB6MesRltpbiXCu__ee6i3O66xPW695u814zjq39TH460-Q-TxUyrWqwBFQke9CMBUXpOJtgoyjIqNhVdIrK-D_iDXZkNlJc7Th3ZUW-0zo_X3k-fMWr6fQmcKWjLvl8IiVYc-2ponlVSiHCJl3t7-Ii_OGmHuw/s72-c/1001650279.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_53.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_53.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content