अखेर PSI गोपाळ बदने पोलिस खात्यातून बडतर्फ. | CrimeNama
Loading ...

अखेर PSI गोपाळ बदने पोलिस खात्यातून बडतर्फ.

  सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला पोलिस खात्यातून बड...

 


सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य केल्याचे आदेशात म्हटले आहे.


फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप डॉक्टर युवतीने केला आहे. आत्महत्येपूर्वी बदने याचे नाव तिने तळहातावर लिहिले. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचा आरोपही तिने केला होता. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे कायद्याचे रक्षकच जर भक्षक झाले तर सामान्य लोकांनी कुणाकडे जायचे, असा प्रश्न उपस्थित झाल्याने बदने याला थेट पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याचे निर्देश फुलारी यांनी दिले.


फलटण युवती डॉक्टर अत्याचार प्रकरणातील अटक आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने, पोलिस उपनिरीक्षक (निलंबीत) याने पोलिस दलाचे पूर्ण ज्ञान असताना, बेफिकिरीने, नैतिक अधःपतन व दुवर्तन, विकृतपणे पोलिस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग, यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली. पोलिस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य करुन कर्तव्य पालनात आणि दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे. तसेच नमूद प्रकारे केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे.


त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यार्थ ठेवणे सार्वजनिक आणि लोकहिताचे दृष्टीकोनातून उचित होणार नाही. म्हणून निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने (फलटण ग्रामीण पोलिस ठाणे, सातारा) यास सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी भारतीय राज्यघटना १९५० मधील अनुच्छेद ३११ (२) (ब) अन्वये दिनांक ०४/११/२०२५ रोजीपासून शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3786,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1248,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,565,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,299,Maharashtra,1711,Mumbai,416,Nagpur,49,Nashik,58,Politics,607,Pune,1875,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,67,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: अखेर PSI गोपाळ बदने पोलिस खात्यातून बडतर्फ.
अखेर PSI गोपाळ बदने पोलिस खात्यातून बडतर्फ.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKh1qEHrAuqFNiS4ex7TKMwUZXkbgeYQjFzVKBmPfush0MK0KvFCJUxiRlyCizc9tjsCNEsrrvc-vC_kJTe6xntl1oD-IoymlQG8bV9FGhCwOwJwzLpdanlxBN5sZjRZstWLstCZrtcUAMdC3fDl6KGzFh3H44aLd7E_eKjB9LUVVHFJUmNdi6fUE2HGA/s320/1001477756.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKh1qEHrAuqFNiS4ex7TKMwUZXkbgeYQjFzVKBmPfush0MK0KvFCJUxiRlyCizc9tjsCNEsrrvc-vC_kJTe6xntl1oD-IoymlQG8bV9FGhCwOwJwzLpdanlxBN5sZjRZstWLstCZrtcUAMdC3fDl6KGzFh3H44aLd7E_eKjB9LUVVHFJUmNdi6fUE2HGA/s72-c/1001477756.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/11/psi.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/11/psi.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content