नारायण राणे यांनी त्यांच्या पोरांना आवरावं, सत्ता येते सत्ता जाते, मात्र लोक तुमच्यावर थुंकल्या शिवाय राहणार नाही,- संजय राऊत. | CrimeNama
Loading ...

नारायण राणे यांनी त्यांच्या पोरांना आवरावं, सत्ता येते सत्ता जाते, मात्र लोक तुमच्यावर थुंकल्या शिवाय राहणार नाही,- संजय राऊत.

दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवावरून वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावरून राजकारण चांगलेच तापले ...



दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवावरून वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावरून राजकारण चांगलेच तापले आणि आरोप प्रत्यारोप सुरु झाले. त्यावर रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

त्यावर नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अमित शाह, शिंदे फडणवीस बैठक यांवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. नवी मुंबई विमानतळाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावर भुमिपुत्रांना काही मिळणार नाही, आम्ही त्यावर आंदोलन करणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.


Sanjay Raut : दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवावरून वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावरून राजकारण चांगलेच तापले आणि आरोप प्रत्यारोप सुरु झाले. त्यावर रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यावर नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अमित शाह, शिंदे फडणवीस बैठक यांवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. नवी मुंबई विमानतळाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावर भुमिपुत्रांना काही मिळणार नाही, आम्ही त्यावर आंदोलन करणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.


भूषण गवई यांचा राजीनामा घेऊन नेपाळमधल्या व्यक्तीला नेमले आहे का? अनिल परब सेनेचे नेते आहेत.तसेच अनिल परब हे कायदे पंडित आहे. अनिल परब यांनी कालच्या गोष्टींवर प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही त्यावर संशोधन केले पाहजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात किरकोळ लोक ज्यांनी त्याचं खाल्ल ते लोक त्यांची विटंबना करतात त्यांना लाज वाटल्या पाहिजे. ते निर्लज्ज आहे, नारायण राणे यांनी त्यांच्या पोरांना आवरावं, सत्ता येते सत्ता जाते. लोक तुमच्यावर थुंकल्या शिवाय राहणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाची विटंबना करणाऱ्यांवर केला आहे.


तसेच अनिल परब यांचे आरोप गंभीर आहेत. याची चौकशी केले पाहिजे. तुमची लायकी आहे का? आमच्या अंगावर याल तर याद राखा, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, रामदास कदम यांच्यावर प्रतिक्रिया देणं ते महान नाही. ते नमक हराम नाही तर काय आहे, यांना किंमत मोजावी लागणार. यांना कोणी माफ करणार नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना वाचवणार नाहीत, असा देखील संजय राऊत म्हणाले.

त्याला गुप्त बैठक म्हणता येणार नाही, तिघांमधील भांडण मिटवायची असतील तर ती बंद दाराआडच मिटवता येतील. देशाचे गृहमंत्री निधड्या छातीचे आहेत कारण त्यांनी काश्मीर मधून ३७० कलाम हटवला, शिवसेनेला फोडले, शिवसेनशी मुंबईत दोन हात करणारे, सोनम वांगचुकला अटक करणारे, ते गृहमंत्री नगर जिल्ह्याच्या आज दौऱ्यावर आहे. लोकांची सुरक्षा आपला विषय असला पहिजे पण तुम्ही येण्याआधी आमच्या राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता? अटक करून घेऊन गेले. मनसे, शिवसेनेचे कार्यकर्ते मराठा समाजाचे कार्यकर्ते यांना नोटीस बजावल्या. तुम्हाला लडाखमध्ये वांगचुकची भीती वाटते. तुम्हाला मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते, तुम्हाला महाराष्ट्रातील शिवसैनिकांची भीती वाटते तुम्ही देशावरती राज्य करताय तुम्हाला भय कसंल आहे? शेतकरी येऊ देणार नाही अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना राजकारणाचा अधिकार आहे का ? आंदोलन करणं लोकशाहीने अधिकारी दिला आहे. मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा त्यांना जाब विचारण्याचा. मुंबईमध्ये मोरारजी देसाई यांची गाडी अडवली आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या देखील गाड्या अडवलेल्या आहेत, यांना लोकांचे आंदोलन नको आहे. लोकांची भीती वाटते, तुम्ही शिवसैनिकांना अटक करता, त्यांनी आंदोलन करण्याचा कोणताही इशारा दिला नाही ते आपलं काम करत होते, त्यांना पोलीस घेऊन गेले, हा काय प्रकार चालू आहे? आपण गृहमंत्री असाल तर तसं वागा. हा पळकुटेपणा कशाला. देवेंद्र फडणवीस देखील तसंच वागत आहेत अटक करून लोकांना तुरुंगात टाकणं, असा म्हणत हा प्रकार माध्यमांसमोर संजय राऊतांनी मांडला.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3704,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1183,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1862,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: नारायण राणे यांनी त्यांच्या पोरांना आवरावं, सत्ता येते सत्ता जाते, मात्र लोक तुमच्यावर थुंकल्या शिवाय राहणार नाही,- संजय राऊत.
नारायण राणे यांनी त्यांच्या पोरांना आवरावं, सत्ता येते सत्ता जाते, मात्र लोक तुमच्यावर थुंकल्या शिवाय राहणार नाही,- संजय राऊत.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQI9theT7fCfXfue3uhcl_-hWHchgtEI9JCEEccwtNqbw51fGy1U5twDajrpTDAA5icXPnkkoIyS4AkJd-fEQfBvXY2wTOsxi8BB1NfQjJ3xv-BrBhvwhAqc8t34UK-eIha2QNIodRzDk5PuL-mm6TfDGu6RoEVHKSfHheBRXfreAZedqwkukyPBj-oC4/s320/1001350760.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQI9theT7fCfXfue3uhcl_-hWHchgtEI9JCEEccwtNqbw51fGy1U5twDajrpTDAA5icXPnkkoIyS4AkJd-fEQfBvXY2wTOsxi8BB1NfQjJ3xv-BrBhvwhAqc8t34UK-eIha2QNIodRzDk5PuL-mm6TfDGu6RoEVHKSfHheBRXfreAZedqwkukyPBj-oC4/s72-c/1001350760.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_46.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_46.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content