पुणेः पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरु असतानाच पतीने पाहिल्यानंतर मध्यरात्री पत्नी आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची ...
पुणेः पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरु असतानाच पतीने पाहिल्यानंतर मध्यरात्री पत्नी आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना देहू रोड परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वर साबळे असे आरोपीचे नाव असून, तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
ज्ञानेश्वर साबळे याच्या पत्नीचा प्रियकर मजुरीचे काम करायचा. साबळेच्या पत्नीचा आधी एक विवाह झाला होता, पहिल्या पतीकडून दोन मुलं ही झाली होती. मात्र, त्या पतीच्या मृत्युनंतर तिने साबळे सोबत लग्न केले होते. पुढे तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाल्याचे साबळेला समजले होते. मात्र, मध्यरात्री त्याला पुरावा सापडला. राहत्या घरापासून लगतच्या परिसरात दोघांना रंगेहात पकडले. यानंतर संतापलेल्या ज्ञानेश्वर साबळे याने या दोघांची हत्या केली. देहूरोड पोलिसांनी साबळेला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, तळवडे परिसरात मध्यरात्री घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विवाहित पत्नी आणि तिच्या प्रियकराचा जागीच हत्या करण्यात आली. ही हत्या पती ज्ञानेश्वर साबळे यानेच केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. देहूरोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS