प्रतिनिधी : नवनाथ मोरे पुणे : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे देण्यात येणारा रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी दिपक बोरगावे यांच्या भवताल आणि...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
पुणे : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे देण्यात येणारा रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी दिपक बोरगावे यांच्या भवताल आणि भयताल या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे, याबाबत माहिती दमसास चे अध्यक्ष धुळुंबुळू यांनी दिली. पुरस्काराचे स्वरुप रुपये रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.
पुरस्कार प्रदान समारंभ गुरूवार दि. २५ मे २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता कोल्हापूर च्या शाहू स्मारक भवनाच्या मिनी हॉलमध्ये होणार आहे.
दीपक बोरगावे हे इंग्रजी विषयाचे माजी प्राध्यापक असून त्यांनी विविध पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. त्यांच्या कवितांतून भवतालचे भयाण वास्तवाची दहाकता समजते. त्यांनी 'गुजरात फाईल्स' या सुप्रसिद्ध पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे.
COMMENTS