पाटणा (बिहार) : पत्नीला मेव्हण्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जमुई जिल्ह्यात घडली आहे. रं...
पाटणा (बिहार) : पत्नीला मेव्हण्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जमुई जिल्ह्यात घडली आहे. रंजित यादव असे मृत पतीचे नाव आहे.
पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून, आरोपी पत्नीसह फरार आहे.
रंजित यादव यांच्या पत्नीचे तिच्या मोठ्या बहिणीच्या पतीशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांना रंजित विरोध करत होते. मृताचे भाऊ सुभाष यांनी सांगितले की, रविवारी रंजित सासरी गेले होते. मात्र, ते घरी परत आलेच नाही. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. यानंतर पोलिसांना तपास करताना झाझा ठाणे परिसरातील ताराकुरा जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. होता.
रंजित यादव हे रविवारी सासरी गेले होते. येथे त्यांनी त्यांच्या पत्नीला मेव्हण्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिले होते. विरोध केल्यानंतर त्यांना सासरी वाईट वागणूक देण्यात आली. रंजित यांनी सुभाषला फोन करुन त्यांना सासरी चुकीची वागणूक देण्यात येत आहे. त्यांच्यासोबत इथे आणखी आपत्तीजनक घटना घडू शकते. यानंतर जेव्हा सोमवारी रंजित घरी परत नाही आले तेव्हा सुभाषने पोलिसात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असता, जंगलात रिक्षा आढळली. यानंतर रंजितचा मृतदेह आढळला. सुभाष यांनी सांगितले की, रंजित यांच्या साडूचे रंजित यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. याला रंजित नेहमी विरोध करत होते.
झाझा पोलिस ठाण्याचे प्रमुख राजेश शरण यांनी सांगितले, अपहरण आणि खुनाच्या शक्यतेबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमवारी सायंकाळी जंगलातून रिक्षा जप्त केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी ऑटो मालक रंजित यादव यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृताची मेहुणी आणि सासूला अटक केली आहे. याप्रकरणी 10 जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. उर्वरितांना अटक करण्यासाठी पोलिस छापे टाकत आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS