नगदवाडी ता.जुन्नर जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेस कै.सौ.प्रफुलता विठ्ठलराव बढे यांच्या ५ व्या पुण्यस्मरणार्थ मुलगा व अनिरुद...
नगदवाडी ता.जुन्नर जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेस कै.सौ.प्रफुलता विठ्ठलराव बढे यांच्या ५ व्या पुण्यस्मरणार्थ मुलगा व अनिरुद्ध रियल इस्टेट मुंबई येथील युवा उद्योजक योगेश विठ्ठलराव बढे यांच्याकडून नगदवाडी शाळेतील १९६ विद्यार्थ्यांसाठी शालेय दैनंदिन परिपाठात व विविध कार्यक्रमात बसण्यासाठी ५००० रुपये किमतीच्या ग्रीन मॅट शाळेस भेट देण्यात आल्याची माहिती केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे यांनी दिली.
यावेळी नगदवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे,नगदवाडी विविध कार्य.सोसायटी संचालक रघुनाथ बढे,शाळा सल्लागार समिती सदस्य संतोष तानाजी बढे,युवा उद्योजक योगेश बढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवा उद्योजक योगेश बढे यांचा शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या निमित्ताने रघुनाथ बढे व योगेश बढे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील पदवीधर शिक्षक मंगेश मेहेर,विद्या वाघ,पंडित चौगुले,निलेश शेलार,आशा आरेकर,उज्वला कांबळे,स्मिता काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले तर आभार निलेश शेलार यांनी मानले.


COMMENTS