लॉक अप 2 येताच अभिनेत्री आकांक्षा चमोलाने अभिनेता नवरा गौरव खन्नासोबत घटस्फोट घेत असल्याचं सांगत सगळ्यांनाच धक्का दिला. त्यानंतर तिने मी ब...
लॉक अप 2 येताच अभिनेत्री आकांक्षा चमोलाने अभिनेता नवरा गौरव खन्नासोबत घटस्फोट घेत असल्याचं सांगत सगळ्यांनाच धक्का दिला. त्यानंतर तिने मी बायसेक्शुअल असून माझे काही महिलांसोबत रिलेशन राहिल्याचाही खुलासा केला.आकांक्षाचे हे 2 मोठे सीक्रेट उघड झाल्यानंतर आता गौरव पहिल्यांदाच आकांक्षासमोर आला आहे. तो तिला असं काही म्हणाला की तिला रडू कोसळलं आहे.
गौरव आणि आकांक्षा यांची पहिली भेट 2015 साली एका ऑडिशनदरम्यान झाली होती. ते एकमेकांच्या प्रेमात पडले त्यानंतर 24 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांनी लग्न केलं. गौरवच्या मूळ गावी कानपूर इथं त्यांचा लग्नसोहळा झाला. त्यांच्या लग्नाला 10 वर्षे होतील. पण गेल्या वर्षभरापासून ते दोघं वेगळे राहत आहेत आणि आता घटस्फोट घेणार आहे, असं आकांक्षाने सांगितलं आहे. तसंच ती बायसेक्शुअल असल्याचं म्हणाली
आकांक्षाचे धक्कादायक सीक्रेट उघड झाल्यानंतर त्यावर गौरव खन्नाची नेमकी प्रतिक्रिया काय असणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना होती. अखेर तो क्षण आलाच. 'लॉकअप 2' या रिॲलिटी शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यात गौरव खन्नाची 'लॉकअप 2' मध्ये एंट्री दाखवण्यात आली आहे. गौरव खन्ना या आठवड्यात पाहुणा म्हणून रिॲलिटी शोमध्ये प्रवेश करणार आहे.
शोच्या प्रोमोमध्ये गौरव आणि आकांक्षा यांची एक अत्यंत भावनिक भेट दाखवण्यात आली आहे. गौरव आकांक्षासमोर येतो. गौरवला पाहताच आकांक्षा भावुक होते. त्यानंतर गौरव तिला जे बोलतो ते ऐकताच ती रडू लागते. गौरव आकांक्षाला तू बँड वाजवून टाकलास असं म्हणतो..
शोमध्ये आकांक्षाने घटस्फोट, बायसेक्शुअल या खुलाशानंतर आपण प्रेमाच्या बाबतीत खूप दुर्दैवी आहे, आता एकटीच स्वत:चं घर घेऊन राहणार, आपला पुढचा प्रवास आपण एकट्याने करणार, लग्न करणार नाही, असं तिने स्पष्टपणे सांगितलं. तसंच शोच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला खूप एकटं आणि असुरक्षित वाटत होते आणि कदाचित शोमध्ये येणं ही एक चूक होती, असं रडत रडत सांगत तिने आपल्या वेदनाही व्यक्त केल्या.


COMMENTS