अनेकदा संकट माणसाला खचवून टाकतात पण त्या वेळी त्या संकटांना मात देऊन पुढे येण महत्वाच ठरतं . अशीच काही माणस आयुष्यातील संकटांनाच आपल्या यश...
अनेकदा संकट माणसाला खचवून टाकतात पण त्या वेळी त्या संकटांना मात देऊन पुढे येण महत्वाच ठरतं . अशीच काही माणस आयुष्यातील संकटांनाच आपल्या यशाची शिडी बनवतात. अशीच एक थक्क करणारी आणि प्रेरणा देणारी घटना कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यात घडली.
तब्बल दोन दशक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सुरेख राजकुमार या शिक्षिकेने अचानक मोर्चा शेतीकडे वळवला . सुरवातीला शेतीचा अनुभव नसतांना सुरेख यांना अनेक कठीण प्रसंगांना समोर जावे लागले . शेतीतील प्रयोगामुळे त्यांना लाखों रुपयांचे नुकसान झाले . पण त्यांच्या एक प्रयोगाने त्यांच संपूर्ण आयुष्य बदललं .
७०० च्या पगारापासून ११ शाळांचे नेटवर्क!
सुरेख यांनी आयुष्याचा बऱ्याच काल संघर्षात काढला . 2005 मध्ये त्याच बी.एड च शिक्षण पूर्ण झाले. पण याच काळात त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले , राहत्या घराचे भाडे भरायला देखील पैसे नव्हत . पैश्यांची गरज भागवण्यासाठी सुरेख आणि त्याच्या बहिणीने 600 ते 700 रूपयाच्या मासिक पगारावर शाळेत शिक्षिका म्हणून काम करायला सुरवात केली . तिथे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
घरची कागटपत्र गहन ठेवून त्यांनी 2007 मध्ये स्वतःची पहिली शाळा सुरू केली . 2014 पर्यंत त्यांनी 'बसवा रत्न स्कूल्स' या बॅनर खाली तब्बल 11 ग्रामीण शाळांचे यशस्वी नेटवर्क उभे केले . या नेटवर्क मधून त्यांना 30-40 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. मात्र , करोना महामारीच्या वेळी वाढत्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे उत्पन्न कमी होऊन केवळ 5 लाख रुपये झाले . या संकट परिस्थिती नंतर सुरेख यांनी शिक्षण क्षेत्र सोडून शेती वेवसेंकडसे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला .
शेत व्यवसाय सुरू करताना सुरवातीला सगळेच या व्यवसायाच्या विरोधात होते . कुटुंबाची 21 एकर जमीन पूर्णपणे कोरडी, बंजर आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेली होती. जमिनीला शेतीयुक्त बनवण्यासाठी त्यांनी 10 लाख रुपयांचे बँक लोन घेतल . बाकी पैसे जमा करून 40-45 लाख रुपयांची मोठी गुंतवणूक केली . बोअरवेल, वीज, ठिबक सिंचन (Drip Irrigation) आणि देखरेखीसाठी शेतात छोटे घर बांधले. त्यांनी 'ODC3' या प्रगत जातीच्या शेवग्याची १५,००० बियाणे लावली.
मात्र , अनुभवांची कमी आणि चुकीच्या सल्ल्यांमुळे पहिल्या वर्षातील सगळ पीक वाया गेल . दुसऱ्या वर्षी रासायनिक प्रक्रियांचा वापर सगळी झाड खराब झाली . या अश्या नुकसानांमुळे त्यांना आतोनात नुकसान सहन करावे लागले .


COMMENTS