परदेशी महिलेने भारत आणि अमेरिकेतील आरोग्यसेवेची तुलना केली. औषधांच्या किमतीतील मोठ्या तफावतीवर तिने आश्चर्य व्यक्त केले. व्हिडिओला लाखो व्...
परदेशी महिलेने भारत आणि अमेरिकेतील आरोग्यसेवेची तुलना केली.
औषधांच्या किमतीतील मोठ्या तफावतीवर तिने आश्चर्य व्यक्त केले.
व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली.भारत हा जगभरात फक्त त्यांच्या मसाल्यांसाठीच नाही तर देशीतील वैद्यकीय उपचार आणि औषधांसाठीही ओळखला जातो. वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनासाठी भारत एक जागतिक शक्तीकेंद्र आहे. दरवर्षी हजारो परदेशी कमी खर्चात उत्तम वैद्यकीय उपचार घेण्यासाठी भारताला भेट देतात. याच पार्श्वभूमीवर अलिकडे एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओएका परदेशी महिला पर्यटकाचा असून व्हिडिओत ती भारतीय औषधांची आणि त्यांच्या किमतींची प्रशंसा करताना दिसली.
फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, 'हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम'; Video Viral
भारतात राहणाऱ्या रिज नावाच्या महिलेने हा व्हिडिओ पोस्ट केला. यात तिने अमेरिकन आणि भारतीय आरोग्यसेवा तसेच औषधांमधील फरकाची तुलना केली. तिने दावा केला की, अमेरिकेत जी औषध ९०० डॉलर (साधारण ८५ हजार रुपये) इतक्या किमतीला मिळते, तेच औषध भारतात मात्र फक्त ३५ ते ३०० रुपयांना विकले जाते. औषधांमधील यो मोठ्या तफावतीवर बोलताना महिलेने म्हटले की, यूएसमध्ये लोकांची गरजेपेक्षा जास्त लुट होत आहे.व्हिडिओत महिला काय म्हणाली?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लिज म्हणाली की, 'भारत आपल्या नागरिकांसाठी स्वस्त दरात औषधे उपलब्ध करुन देत आहे, परंतु अमेरिकेतील औषधांचा मोठा खर्च सामान्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. अमेरिकेत आमच्यासोबत लूट होत आहे. दुसरीकडे, भारत आपल्या नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत आरोग्यसेवा पुरवत आहे'. महिलेचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून याला ९ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडिओ @spicygori नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, "तरीही, बहुतेक भारतीयांना ते परवडत नाही", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "सरकारी रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार मिळतात, सरकारचे आभार", आणखी एका यूजरने लिहिले आहे, "योग्य मुद्दा आहे. भारत नेहमीच सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये परवडणाऱ्या आरोग्यसेवेच्या शोधात असतो. हा एक मोठा फायदा आहे.".
टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.


COMMENTS