मध्य प्रदेशातील कुक्षी परिसरात गुन्हेगारीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निसारपूर पोलीस ठाणे परिसरात एका बनावट तांत्रिकानं महिलेला मू...
मध्य प्रदेशातील कुक्षी परिसरात गुन्हेगारीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निसारपूर पोलीस ठाणे परिसरात एका बनावट तांत्रिकानं महिलेला मूळव्याधीतून बरे करण्याचे आश्वासन दिले.
नंतर पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, पीडितेला धमकावून या गुन्ह्यात तांत्रिकाला मदत करणाऱ्या तीन आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या मुख्य तांत्रिकासह सर्वच आरोपींचा शोध घेत आहेत. संबंधित प्रकरणातील आरोपीची कैलास अशी ओळख समोर आली आहे.
मूळव्याधीच्या उपचाराचं कारण सांगितलं
घडलेल्या घटनेनुसार, पीडितेचा मेहुणा रेव सिंह आणि सतीपुरा येथील रहिवासी असलेला राकेश तिला मोटारसायकलवरून मनावर बस स्टँडवर घेऊन आला होता. महिलेला सांगितलं की, पिपलिया गावात धन्नालालच्या घरी कैलास नावाचा एक तांत्रिक राहतो, तो तांत्रिक विधींद्वारे मूळव्याधीवर उपचार करेल, असं सांगून पीडितेची फसवणूक केली. नंतर ते त्या महिलेला धन्नालालच्या घरी घेऊन गेले होते.
महिलेवर लैंगिक अत्याचार
तांत्रिक कैलास धन्नालालच्या घरातील तिसऱ्या खोलीत आधीपासून राहत होता. आरोपी राकेश, रेवसिंह आणि धन्नालाल यांनी महिलेला आतच ठेवलं आणि बाहेरून दरवाजा बंद केला. खोलीत महिला एकटीच पाहून नराधम कैलासने तिला धमकावले, शांत बसण्यास सांगितले. मला जे हवंय ते करू दे अन्यथा विधीचा उलटा परिणाम होईल, असं म्हणत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेनंतर व्यथित झालेली पीडित महिला खोलीतून बाहेर पडली. तिने रेव सिंह, राकेश आणि धन्नालाल यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. पीडितेला मदतीऐवजी त्या तिघांनी देखील तिला धमकावले की, जर याबाबत कोणाला काही सांगितल्यास तांत्रिक विधी करेन.


COMMENTS