चिलीच्या अटाकामाला जगातील सगळ्यात कोरड्या वाळवटांपैकी एक मानलं जातं. इथे इतकी उष्णता असते की, कुणीच राहू शकत नाही. जर कुणी इथे राहतही असती...
चिलीच्या अटाकामाला जगातील सगळ्यात कोरड्या वाळवटांपैकी एक मानलं जातं. इथे इतकी उष्णता असते की, कुणीच राहू शकत नाही. जर कुणी इथे राहतही असतील, तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल.
इथे लोक राहत नाहीत, पण इथेच अनेक ब्रँडेड कपड्यांचा ढीग लागला आहे. कुणी कधीच न घातलेले कितीतरी कपडे इथे ढीगाने पडलेले आहेत. नवीन आणि ब्रँडेड असूनही कपडे इथे का फेकले जातात? जाणून घेऊया.
वाचून आश्चर्य वाटेल की, दरवर्षी इकीके बंदराहून ५९ हजार टन कपडे इथे पोहोचतात. यातील ८५ टक्के कपडे कधी बाजारात विकलेही गेलेले नसतात. ते थेट वाळवंटात फेकले जातात. या कपड्यांना कुणी हातही लावत नाहीत. दरवर्षी ५९ हजार टन कपडे वाळवंटात फेकले जातात. हे ढीग इतका मोठा असतो की, स्पेसमधूनही दिसतो. वाळवंटात उष्णता आणि कोरडेपणामुळे अनेकदा या कपड्यांना आगही लागते. ज्यात लाखो-कोट्यावधी रूपयांचे ब्रँडेड कपडे खराब होतात.
एकीकडे हजारो टन कपडे वाळवंटात फेकले जातात आणि दुसरीकडे जगात ७० कोटी लोक असेल आहेत ज्यांना घालायला पुरेसे कपडेही मिळत नाहीत. आफ्रिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये आई-वडिलांना हे ठरवावं लागतं की, मुलांना खाऊ घालायचं की शूज घेऊन द्यायचे. ही समस्या फास्ट फॅशन इंडस्ट्रीमुळे वाढली आहे. ब्रँड प्रत्येक सीझनमध्ये नवीन डिझाइन आणतात आणि जुना स्टॉक स्वस्तात विकतात किंवा मग फेकतात. चिली या डंपिंगचं सगळ्यात मोठं केंद्र मानलं जातं. कारण इथे स्वस्तात जागा मिळते.
पर्यावरणाचं नुकसान
या फेकल्या जाणाऱ्या कपड्यांमुळे वाळवंटातील माती प्रदूषित होत आहे. सिंथेटिक कपड्यांमधून निघणाऱ्या केमिकलने पाणी आणि माती दोन्हीही खराब होत आहे. जलवायु परिवर्तनाच्या या काळात हे पर्यावरणाचं मोठं नुकसानच आहे. एक्सपर्ट सांगतात की, समस्या प्रॉडक्शनमध्ये नसून ती डिस्ट्रीब्यूशन सिस्टीममध्ये आहे. जगात जिथे कपड्यांची गरज आहे, ते तिथे पोहोचवण्याची सुविधा बनवावी लागेल. काही संघटना "Peace Through Trade" सारख्या मॉडलवर काम करत आहे. ही संघटना गरजू लोकांपर्यंत कपडे पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा चिलीमधील कपड्यांचे फोटो व्हायरल झाले ते बघून लोक थक्क झालेत.
भारत सुद्धा फास्ट फॅशन मार्केटमध्ये वेगाने वाढत आहे. आपल्याला सुद्धा या समस्येसोबत दोन हात करावे लागणार आहे. रिसायकलिंग, सेकंड हँड मार्केटला प्रोत्साहन आणि जागरूकता वाढवली पाहिजे. अटाकामाची ही कपड्यांची स्मशानभूमी मनुष्यांच्या लालसेची आणि वाया घालवण्याचं जिवंत प्रमाण आहे.


COMMENTS