Ajit Pawar | "मला हलक्यात घेऊ नका" एकनाथ शिंदे यांच्या वाक्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया. | CrimeNama
Loading ...

Ajit Pawar | "मला हलक्यात घेऊ नका" एकनाथ शिंदे यांच्या वाक्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया.

Maharashtra Politics : 'मला हलक्यात घेऊ नका' असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली असून, ...



Maharashtra Politics : 'मला हलक्यात घेऊ नका' असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्या वक्तव्यानं मात्र चांगलाच हशा पिकला होता.

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, अजित पवार यांनी स्वतः प्रश्न केला की, या विधानातून एकनाथ शिंदे हे नक्की मशालीकडेच बोट दाखवत आहेत की दुसऱ्या कोणाकडे? त्यामुळे महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस ही फक्त चर्चा नसल्याचं आता बोललं जातंय.


तालकटोरा स्टेडियममध्ये शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, अलीकडेच एकनाथजींनी 'मला हलक्यात घेऊ नका' असं वक्तव्य केलं होतं. तसंच, त्यांच्या निशाण्यावर कोण होतं, हे स्पष्ट झालं नाही. त्यानंतर अजित पवारांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यावर बोलणार का यावर सर्वांचं लक्ष होतं, पण त्यांनी त्यावर बोलणं टाळलं.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमादरम्यान शिंदे म्हणाले होते, 'मला हलक्यात घेऊ नका'. त्यामुळे हा इशारा नेमका विरोधकांना आहे की, सोबतच्याच प्रतिस्पर्धी पक्षांना अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, महायुती युतीमध्ये कोणताही दुरावा नाही.


दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच मराठीला 'अभिजात भाषेचा' दर्जा देण्यात आला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध राखले पाहिजेत हे सांगताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात कशी सौहार्दपूर्ण भेट झाली याचं उदाहरण दिलं.

गेल्या काही दिवसांपासून, राज्याच्या राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, राज्यातील महायुती सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडच्या काही वक्तव्यांमधूनही ते दिसून आलं होतं.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,83,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3847,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1295,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,603,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,26,Lifestyle,305,Maharashtra,1724,Mumbai,419,Nagpur,49,Nashik,64,Politics,610,Pune,1881,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,29,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,69,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: Ajit Pawar | "मला हलक्यात घेऊ नका" एकनाथ शिंदे यांच्या वाक्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया.
Ajit Pawar | "मला हलक्यात घेऊ नका" एकनाथ शिंदे यांच्या वाक्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiLIQ2nvUly7tze0JDhjkjZN-jRAN2FIy3lllF7XqYNfplLSL9v8G0n4APIuUBZbscAmikKo91BQxMTBZE-SAYJ_sKZHt_gT02V4PefintNMbYVGfmiamIGO4hScudX-yJJG0IIm0L7EXfKUD3rjrN0W7lMDuzV9p_5rHQiOWs1zs1rJdQXs_V5u_HhxYw/s320/1000620953.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiLIQ2nvUly7tze0JDhjkjZN-jRAN2FIy3lllF7XqYNfplLSL9v8G0n4APIuUBZbscAmikKo91BQxMTBZE-SAYJ_sKZHt_gT02V4PefintNMbYVGfmiamIGO4hScudX-yJJG0IIm0L7EXfKUD3rjrN0W7lMDuzV9p_5rHQiOWs1zs1rJdQXs_V5u_HhxYw/s72-c/1000620953.png
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/02/ajit-pawar_23.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/02/ajit-pawar_23.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content