सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे महात्मा ज...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकारात्मक विचारसरणी आणि शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्गार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी काढले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्रा.राजीव सावंत,डॉ. महेश भास्कर, बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,फार्मसीचे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, डॉ.संतोष घुले पॉलिटेक्निक चे प्रा.अनिल कपिले, आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, प्रशासकीय अधिकारी, प्रा.प्रदीप गाडेकर, रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले, प्रा.दिनेश जाधव विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा फुले बद्दल माहिती देताना डॉ.महेश भास्कर म्हणाले की, महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये‘महात्मा’ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. अशा या थोर समाजसेवकांच्या प्रति आपण सर्वजण कृतज्ञ राहून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊयात आणि आपले इप्सित शैक्षणिक कार्य अखंडितपणे समाजामध्ये निर्विवाद पोहचवूया असे आवाहन प्रा.राजीव सावंत यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार डॉ.संतोष घुले यांनी मानले.
COMMENTS