क्राईमनामा लाईव- म्हशींची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला अपघात झाल्याने 8 म्हशींचा जागीच मृत्यू झाला. कल्याण नगर महामार्गावरील पिंपरी पेंढार...
क्राईमनामा लाईव- म्हशींची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला
अपघात झाल्याने 8 म्हशींचा जागीच मृत्यू झाला. कल्याण नगर महामार्गावरील पिंपरी पेंढार
परिसरात हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. मंगळवारी पहाटेच्या
सुमारास हा अपघात घडला. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मुंबई येथून कल्याण नगर
महामार्गाने एक टेम्पो म्हशी घेऊन जात होता.
टेम्पोत 10 म्हशी होत्या. पिंपरी पेंढार परिसरातील एका वळणावर
टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या लगत असणाऱ्या खड्ड्यात जाऊन पलटी
झाला. यामध्ये टेम्पोतील दहा म्हशींपैकी आठ म्हशींचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूकीची कोंडी झाली
होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना तातडीने
आळेफाटा येथील खाजगी रूग्नालयात उपचारासाठी दाखल केले. तर घटनास्थळी दाखल झालेल्या
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून आठ म्हशी मयत झाल्याचे घोषित केले. ओतूर पोलीस
या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
COMMENTS