सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) चिमुकल्यांनी बांधल्या झाडांना राख्या क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित बेल्ह...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
चिमुकल्यांनी बांधल्या झाडांना राख्या
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित बेल्हे (बांगरवाडी) येथील समर्थ गुरुकुल या बी एस ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये रक्षाबंधन एका वेगळ्या स्वरूपात साजरे करण्यात आले.
प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधन व इतिहासातील दाखले,संदर्भ याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
आज या चिमुकल्यांनी कार्यानुभव या विषयांतर्गत आपल्यातील कल्पकता आणि क्रियाशीलता यांना वाव देत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्यांची निर्मिती उपलब्ध असलेल्या दैनंदिन वापरातील वस्तूंचा उपयोग करून केली.
यावेळी गुरुकुल मध्ये विद्यार्थी निर्मित राख्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करणे हि काळाची गरज आहे.वृक्ष आमुचें सखे-सोबती असे सांगत झाडांना,वृक्षांना,वेलींना आपला भाऊ मानून निसर्गच सर्व गोष्टींचा रक्षणकर्ता आणि तारणहार आहे.अशा या निसर्गाशी बंधुत्वाचे नाते जोडून सदैव पाठराखण कर अशी प्रार्थना चिमुकल्यांनी केली.आज या लहान मुलांनी निसर्गाला आपला भाऊ म्हणून त्याच्याकडे जे रक्षणाचे साकडे घातले त्याला नक्कीच निसर्ग साद घालीन अशी अपेक्षा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके,खजिनदार तुळशीराम शिंदे,विश्वस्त वल्लभ शेळके,प्राचार्य सतीश कुऱ्हे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS