विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले. ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर , येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयात विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या...
विशेष प्रतिनिधी : प्रा.
निलेश आमले. ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर, येथील
श्री शिव छत्रपती महाविद्यालयात विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या उद्घाटनानिमित्त 'फॅशन
आणि ड्रेस डिझाईनिंग' सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या
प्रमुख पाहुण्या सौ.मानसीताई कोयंडे यांनी फॅशन म्हणजे काय व फॅशन डिझायनिंग हा एक
उत्तम व्यवसाय कसा होऊ शकतो याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधत 'बनवा,विका आणि कमवा' हा
व्यवसायाचा मंत्र दिला.
अध्यक्ष प्रतिनिधी
प्रा.व्ही.बी.कुलकर्णी याप्रसंगी बोलताना म्हणाले की, पुस्तकी
शिक्षणाबरोबरच रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या विविध कोर्सेसची सध्याच्या पिढीला
आवश्यकता आहे. तसेच महाविद्यालयाचे
प्रभारी प्राचार्य डॉ. यु. बी. शेलार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
'महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत, फॅशन
डिझायनिंग हे देखील एक व्यावसायाभिमुख क्षेत्र असून विद्यार्थिनींना या संधीचा
फायदा घेऊन आपले व्यवसाय कौशल्य विकसित करावे'
असे मनोगत त्यांनी
अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
याप्रसंगी वरिष्ठ
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी .व्ही. उजगरे,
कनिष्ठ महाविद्यालयाच्या
उपप्राचार्या प्रा.पी.एस.लोढा,पर्यवेक्षक प्रा.एस. ए. श्रीमंते, एम.सी.व्ही.
सी. विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके,
कला व वाणिज्य विभाग
प्रमुख प्रा.पी.व्ही.तांबे,विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सौ.
पी.आर.कासार, श्री. दशरथ कबाडी व सर्व महिला
प्राध्यापिका उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे
प्रास्ताविक विद्यार्थिनी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. सौ.कविता शिंदे यांनी व
सूत्रसंचालन प्रा.सौ.वैशाली सावंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.सौ.सारिका
सोनार यांनी करून दिला.आभार प्रदर्शन प्रा.ज्योती दुराफे यांनी केले.
COMMENTS