सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी शरीर हीच यशाची गुरुकिल्ली: अनिल गुंजाळ समर्थ रूरल एज्...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी शरीर हीच यशाची गुरुकिल्ली: अनिल गुंजाळ समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) या विद्यालयामध्ये नुकतेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा व नवीन विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ साहेब यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जुन्नर तालुका शिक्षक-पालक संघांचे अध्यक्ष एच पी नरसुडे, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, गुंजाळवाडी गावचे सरपंच लहू शेठ गुंजाळ, तानाजी गाडगे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली ताई आहेर, एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत, पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले, प्रा.संजय कंधारे,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनिल गुंजाळ म्हणाले कि, जीवनात अनेक वेळा अपयश येते त्याला न घाबरता, दडपण न घेता आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करा. सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी शरीर हीच यशाची गुरुकिल्ली आहे. यावेळी परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा याबद्दल गुंजाळ यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या शुभहस्ते इ.१२ वी मध्ये विशेष प्रविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या
विज्ञान शाखेतील पायल गुंजाळ, सिद्धेश लामखडे, आरती वाघमारे व साहिल महाले यांचा तसेच वाणिज्य ( मराठी मिडियम ) विभागातून अनुजा बारेकर, पूनम डुकरे, सोनाली आहेर, अविनाश बेलकर व दिनेश डोंगरे यांचा तर वाणिज्य (इंग्रजी मिडियम) मधील रितेश गुंजाळ, तन्वी गाडगे, पायल येवले या विद्यार्थ्यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.
भविष्यात वाटचाल करत असताना विविध कौशल्य विकासाची गरज असते. महाविद्यालयातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असल्याकारणाने विविध कलागुण विकसित होण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेऊन भविष्याची वाटचाल करावी असे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संगीता रिठे यांनी,प्रास्ताविक प्राचार्या वैशाली ताई आहेर यांनी तर आभार प्रा.एच पी नरसुडे यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. संतोष पोटे,प्रा.राजेंद्र नवले, प्रा.सुरेखा पटाडे, प्रा.संपत जाधव, प्रा.विनोद चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.
COMMENTS