सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७२७ व्या पुण्यतिथी निमित्त गोळेगाव मध्ये विविध ...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा
Live : संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७२७
व्या पुण्यतिथी निमित्त गोळेगाव मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
होते.
अखंड
हरिनाम सप्ताह , सावता महाराजांचे मूळ गाव आरण भेंडी येथून
ज्योतीचे आगमन व मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
गोळेगाव च्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात पायी दिंडी काढून पालखी आणि
ज्योती चे स्वागत केले. गावातील महिला व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग
घेतला.
यावेळी
शाळेमध्ये देखील दरवर्षी प्रमाणे पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांची व मान्यवरांची भाषणे झाली.
याप्रसंगी
काशिनाथ दत्तात्रय लोखंडे यांचा मुलगा स्वर्गीय जीवन लोखंडे यांच्या स्मरणार्थ
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . तसेच गिरीजा ग्रामीण
पतसंस्थेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.
ह.भ.प.
गणेश महाराज शिंदे यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन
करण्यात आले होते.
यावेळी
लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे,
सचिव जितेंद्र बिडवई, गिरजा
पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई, विश्वस्त काशिनाथ लोखंडे, दीपक
कोकणे, भारत शेटे ,अशोक वऱ्हाडी, जयवंत
डोके, शंकरराव ताम्हाणे, रोहिदास
बिडवई, केशव बिडवई,
विश्वनाथ लोखंडे, मुख्याध्यापक
मोहन नाडेकर , सुधीर हेजीब,रत्नाकर डोके सर्व शिक्षक व ग्रामस्थ
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS