मुंबई : कुर्ला परिसरात एका १९ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार आरोपींना ...
मुंबई : कुर्ला परिसरात एका १९ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पीडित महिला ही कोलकाता येथील रहिवासी असून, काही महिन्यांपूर्वी ती नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आली आहे. तिच्या भावोजींनी तिला कुर्ल्यातील एका खोली मालकाकडे तिला नेले होते. त्या ठिकाणी काही भिकारी भाड्याने राहत होते. याच घरातील भिकाऱ्यांकडून पैसे घेत पीडितेच्या भावोजींनी मेहुणीला त्यांच्या ताब्यात दिले. शिवाय, भावोजीनेही तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला शहरात नवीन असल्याने ती प्रचंड घाबरल्यामुळे तिने कुणालाही सांगितले नाही. पण, काही दिवसांनी पीडित महिला गरोदर झाल्याचे लक्षात येताच हा सर्व प्रकार उघडकीस आला.
पीडित महिलने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेचा भावोजी याच्यासह एकूण चौघांना अटक केली आहे. तर पाचवा आरोपी पश्चिम बंगालला फरार झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS