पुणे : एका व्यक्तीने आपल्या पत्नीला त्याच्या दोन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार भारती विद्यापीठ पोलिस स...
पुणे : एका व्यक्तीने आपल्या पत्नीला त्याच्या दोन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.
या प्रकारणी महिलेने (वय 48) पती आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पती पत्नीला मानसिक त्रास देत होता. तिची इच्छा नसतानाही त्याने 2020 मध्ये हडपसर येथील एका लॉजवर मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. यानंतर जुलै 2021 मध्ये कोरेगाव पार्क परिसरात एका फ्लॅटवर दुसऱ्या एका मित्रासोबत पत्नीला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हे सर्व होत असताना पती मात्र कोपऱ्यात उभे राहून पाहत असे. संबंधित प्रकार वारंवार घडू लागल्याने संतापलेल्या पत्नीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याबाबत पुढील तपास करीत आहे.
COMMENTS